[ez-toc]
परिचय
Seed Sowing तीन हंगामांत केली जाते. खरीप हंगाम हा जून ते ऑक्टोबर या दरम्यान समजला जातो. कापूस, भात, ज्वारी, बाजरी यांसारखी पिके खरीप हंगामात घेतली जातात. खरिपात या पिकांना पाणी देण्याची गरज नसते. रब्बी हंगाम हा ऑक्टोबर ते मार्चपर्यंत असतो. ज्या पिकांना थंड हवामान मानवते अशी पिके रब्बी हंगामात घेतली जातात. उदाहरणार्थ, गहू, हरभरा, करडई, इत्यादी. उन्हाळी हंगाम मार्च ते जूनपर्यंत समजला जातो. उन्हाळी हंगामात खरबूज, काकडी, टरबूज, दोडका, उन्हाळी भुईमूग ही पिके घेतली जातात.
Seed Sowing हंगाम
पेरणीची वेळ विचारात घेताना पहिला मुद्दा विचारात घेतला जातो तो म्हणजे जमिनीतील ओलावा, तरीसुद्धा काही वेळेस पिकाच्या वाढीस जास्त काळ मिळण्यासाठी. व पाऊस वेळेवर होईल या अपेक्षेने कोरड्या मातीत पेरणी केली जाते यास धूळ पेरणी’ असे म्हणतात. जमीन वाफशावर आल्यानंतर पिकांची पेरणी केली जाते. त्यामुळे बियांची उगवण चांगली होते व पेरणीसुद्धा व्यवस्थित करता येते. यानंतर दुसरा विचारात घेतला. .जाणारा मुद्दा म्हणजे हवेतील व जमिनीतील तापमान कमी पाहिजे त्या प्रमाणात खाली गेले नाही तर गव्हासारख्या पिकांच्या रोपाना मुळकुजव्या रोग होतो. कीड व रोग पडण्याचा अंदाज यावरूनही पेरणीची वेळ ठरविली जाते. खोडमाशीपासून पिकाचे संरक्षण व्हावे म्हणून महाराष्ट्रात खरीप ज्वारीची पेरणी ही सात जुलैपूर्वी केली जाते.
Seed Sowing पद्धती
पेरणीच्या (Sowing) चार मुख्य पद्धती आहेत त्या पुढीलप्रमाणे :
(1)बी फोकणे
काही पिकांची पेरणी (Sowing) बी फेकून केली जाते. त्यासाठी बी सर्व शेतात एकसारखे हातानेफेकले जाते नंतर कुळवाने बी मातीत झाकले जाते. किंवा लाकडी फळी फिरवली जाते. ही पद्धत सर्वांत स्वस्त पेरणी जलद करण्यासाठी उपयोगी आहे. परंतु या पद्धतीचे तोटे खालीलप्रमाणे आहेत:
(2) पाभरीने पेरणी (ड्रिलिंग)
कोरडवाहू व बागायत पिकांची पेरणी (Sowing) या पद्धतीने केली जाते. या पद्धतीने बियाणे पाहिजे त्या खोलीवर टाकले जाते. दोन ओळींतील अंतर आवश्यकतेप्रमाणे ठेवले जाते. पेरणीची खोलीसुद्धा काही प्रमाणात सोयीची करता येते. परंतु या पद्धतीत दोन रोपांतील अंतर एकसारखे ठेवता येत नाही.
(अ) या पद्धतीत प्रती हेक्टरी बियाणे जास्त प्रमाणात लागते.
(आ) पेरणी (Sowing) एकसारखी नसल्यामुळे पीक सारख्या प्रमाणात येत नाही.
(इ) काही ठिकाणी पीक दाट तर काही ठिकाणी पातळ असते व उगवण सारखी होतनाही.
(3) टोकन पेरणी (डिवलिंग )
भुईमूग, एरंडी, घेवडा, मका यांसारखे मोठ्या आकाराचे बियाणे या पद्धतीने पेरले जाते. आपल्याला पाहिजे त्या अंतरावर खुणेच्या ओळी ओढूनओल्या मातीत बी टाकले जाते. प्रत्येक फुलीवर दोन किंवा तीन बिया टोकतात. नंतर जोमदार रोप ठेवून इतर कमजोर रोपांची विरळणी केली जाते. या पद्धतीत वेळ व मजूर जास्त लागत असल्याने ही पद्धत खर्चीक आहे. परंतु दोन ओळींतील व दोन रोपांतील अंतर योग्य राखल्यामुळे पिकाची वाढ एकसारखी व जोमदार होते. या पद्धतीत आंतरमशागत दोन्ही दिशांनी करता येते.
(4) रोपांची लागण करणे (ट्रान्सप्लॉटिंग)
काही पिकांची रोपे वाफ्यात वाढवून नंतर या रोपांची लागण शेतात केली जाते. उदाहरणार्थ, भात, तंबाखू व भाजीपाला, इत्यादींची रोपे वाफ्यामध्ये 3 ते 5 आठवडे वाढू देतात. नंतर वाफ्याला रोप लागणीच्या आदल्या दिवशी पाणी देऊन या रोपांची शेतात लागण करतात. या पद्धतीत रोपे नवीन जागी सहजरित्या प्रस्थापित होतात व रोप मरण्याचे प्रमाण कमी होते.
पेरणीची अवजारे
(1) एक चाड्याची पाभर
यातून एका वेळी फक्त बी पेरता येते. वरच्या बाजूला चाड्यातून कुशल कामगार ठरावीक प्रमाणात बी सोडतो. हे बी त्याखालील नळीतून फणीपर्यंत येते. फणीच्या खालच्या बाजूला उघडणाऱ्या छिद्रातून हे बी जमिनीत टाकले जाते. पेरणीची खोली ठरावीक ठेवता येते. परंतु बियाणे सोडणारा कामगार कुशल नसेल तर दोन रोपांमधील अंतर खूप कमी किंवा खूप जास्त झालेले दिसते.
(2) दोन चाड्यांची पाभर
एका चाड्याच्या पाभरीने एका वेळी फक्त बी पेरता येते. परंतु दोन चाड्यांच्या पाभरीने एकाच वेळी बी आणि खत पेरता येते. एका चाड्यातून बी सोडले जाते आणि दुसन्या चाड्यातून खत सोडले जाते. एकाच फणावर असलेल्या दोन वेगवेगळ्या छिद्रांतून खत व बी प्लास्टिकच्या नळीद्वारे जमिनीत पडते. बी व खत यांचा एकमेकांशी संबंध येत नाही. फणीच्या दोन छिद्रांत अंतर असल्याने खत बीजाच्या 5 सेंमी. बाजूला पडते. त्यामुळे खताचा बियांशी प्रत्यक्ष संबंध येत नाही. उलट बी रुजल्यानंतर रोप जसजसे वाढेल तसतसे हे खत मुळांना उपलब्ध होते. अशा प्रकारे बियाणे व खत एकाच वेळी पेरल्याने मजुरीवरीलखर्च कमी होतो. तसेच खताचा अपव्यय टाळला जातो. ग्रामीण भागातील सुतार अशा प्रकारची पाभर सहज तयार करू शकतो. या पाभरीने पेरणी केली असता एका दिवसामध्ये एक हेक्टर क्षेत्र पेरता येते.
(3) बहुविध टोकण यंत्र
हे यंत्र बैलजोडीने चालविता येते. या यंत्रास बियाण्याकरिता तीन व खताकरिता तीन असे एकूण 6 फण असतात. बियाण्याच्या ओळीच्या बाजूस सुमारे 5 सेंमी. अंतरावर व बियाच्या खाली दाणेदार खते प्रमाणित करून पेरता येतात. या यंत्रात दोन ओळींतील अंतर 22.5, 30 व 45 सेंमी. ठेवता येते. भुईमूग, सूर्यफूल, करडई, सोयाबीन, ज्वारी, मका, हरभरा,गहू व भात या पिकांची पेरणी करण्यासाठी हे यंत्र वापरले जाते.
(4)एकफणी टोकण यंत्र
बैलजोडी नसेल तरीसुद्धा पेरणी करता यावी यासाठी हे यंत्र आहे. हे हाताने चालवायचे यंत्र आहे. या यंत्राने भुईमूग, मका, ज्वारी, सूर्यफूल, सोयाबीन, हरभरा ही पिके टोकन येतात.
(5) भातलावणी साधन
चिखलणी केलेल्या शेतात भातलावणी साधनाने, भातलावणी करता येते. या साधनामुळे भातलावणीसाठी पारंपरिक पद्धतीमध्ये लागणाऱ्या मनुष्यबळापेक्षा हेक्टरी 45 ते 50 ‘मनुष्य तास’ कमी लागता