[ez-toc]
संत्रा आंबे बहाराचे (Santra Ambia Bahar) नियोजन.
संत्रा आंबे बहाराचे (Santra Ambia Bahar) नियोजन करताना फळ जे तुटीचे होतात त्यासाठीचे खत नियोजन .संत्रा आणि मोसंबी साठी मृगबहार पकडल्यानंतर मृगाचा पाऊस झाल्यानंतर पाणी चालू असल्यास ,फळांना झाडाला ताकद मिळण्यासाठी युरिया 400 ते 500 ग्रॅम ,पोटॅश 250 ते 300 ग्रॅम प्रति झाड द्यायला पाहिजे .फळगळ होत असेल तर खताचा नियोजन चांगल्या पद्धतीने केले पाहिजे. झाडाला ताकद दिली तरच फळगळ होणार नाही. पाणी चालू ठेवायचा आहे ,पाणी जर बंद केले तर झाड सुकन
फायटक्लोरा बुरशी लागण होऊ शकते . संत्राआंबे बहारा जे घेतात त्या लोकांनी जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत पाणी कमी पडून देऊ नये . त्यानंतर जुलै महिन्यामध्ये आणखी दुसरा एखादा डोस भरायचा आहे .
दुसरा डोस देताना DAP 500 ग्रॅम ,नत्र 200 ग्रॅम, पोटॅश 500 ग्रॅम ,हेमिकॅसिड 50 ग्रॅम ,मायकोरायझा 50 ग्रॅम ,मॅग्नेशियम 100 ग्रॅम ,मायक्रो न्यूटन 100 ग्रॅम प्रति झाड हा दुसरा डोस देऊन पाणी द्यायचं . एनपीके बूस्ट या जैविक खतांचा जास्तीत जास्त वापर करायचा या खतांमध्ये मुळे जमीन मोकळी होऊन झाडांना खत उचलण्यास मदत होते त्यामुळे झाडांची आणि फळांची क्वालिटी चांगली होते . यानंतर एक महिन्याने परत जैविक खंडाचा वापर करायचा किंवा पाण्यात सोडा आणि ज्या भागात विद्राव्य खतावर किंवा ड्रीप वर आहेत त्यांनी 19:19, 5 किलो एकरी दर आठवड्यात ड्रिप मधून द्यायचं आणि मायक्रो न्यूटन एक लिटर आणि एनपीके बूस्ट एक लिटर किंवा एनपीके हाय 500ml एकरी सोडायचं . वरचा डोसा दोन आठवड्याने द्यायचा .
त्यानंतर दुय्यम अन्नद्रव्ये द्यायचे आहे दुय्यम अन्नद्रव्य फार महत्त्वाचे असतात झाडाला फक्त एनपीके ची गरज नाही तर दुय्यम अन्नद्रव्याची ही फार गरज असते दुय्यम अन्नद्रव्यामुळे फळाचा आकार ,गोडी ,रंग आणि वजन या गोष्टीचा विकास चांगला होतो . यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट, झिंक सल्फेट ,फेरस सल्फेट, बोरॉन हे ड्रिप मधून दिले तरी चालतील या पद्धतीने खत व्यवस्थापन करा .
फळ तडकल्यास उपाय पहा .
फळ हे कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन हे कमी असल्यास तडकतात. त्यासाठी 13-00- 45 आणि पोटॅशियम सोनाईट याची फवारणी घ्यायची. 13:00:45. 100 ग्रॅम आणि पोटॅशियम सोनेट 100 ग्रॅम 16 लिटर अशी फवारणी घ्यायची, त्यानंतर झाडाला ड्रिप मधून 13-00-45. 5 किलो पोटॅशियम सोनेट 5 किलो असे ड्रिप मधून द्यायचे हे दिल्यामुळे फळ तडकनार नाही.
वायभार
आंब्याभरामध्ये (Santra Ambia Bahar) जास्त समस्या ही शेतकऱ्यांना वायभारराची असते .वायबार म्हणजे देठापाशी फळ लांब होते आणि खालचा भाग फुगतो त्यास वायभार म्हणतात , यासाठी झिंक फेरस आणि मॅग्नेशियम यांची फवारणी चालू ठेवावी लागेल याच्या फवारण्या जर व्यवस्थित केल्या तर वाय-बाराचा प्रादुर्भाव हा कमी राहील .त्यानंतर कॉपर आणि स्टेप्टोसायक्लीन एक फवारणी घ्यायची .वायभार हा मोसंबी पेक्षा संत्रात जास्त असतो ,त्यामुळे संत्रा बागायतरांनी जास्त काळजी घ्यायची आहे.
कोळीचा अटॅक
त्यानंतर संत्रा बागामध्ये कोळीचा अटॅक जास्त असतो. त्यासाठी उपाय पाहू .संत्रा बागामध्ये कोळीचा प्रादुर्भाव जास्त झाला तर फळ काळी पडतात आणि फळ पूर्णपणे खराब होतात. त्यासाठी फवारणी सल्फाबूस्ट -३० ग्रॅम/ ETN सुपर-30 मिली / ओमाइट -30 मिली / मॅजिस्टर -15 मिली. जैविक नियंत्रण व्हर्टिसिलीयम – 75 मिली+ बेस्टीकर- ५ मिलि प्रति पंप या फवारणीने कोळीचा 50- 60% पर्यंत प्रादुर्भाव कमी होईल .
फुलकिडे (थ्रिप्स)
त्यानंतर थ्रिप्स मुळे जास्त फळांचा आकार खराब होतो त्यासाठी थ्रिप्ससाठी रिहांश -20 मिली/ रेज -15 मिली/ डिझायर – 30 मिली+बेस्टीकर-५ मिलि प्रती पंप,,
मिलीबग नियंत्रण
मिलीबग हा संत्रापेक्षा मोसंबी जास्त आढळतो त्याच्या नियंत्रणासाठी पांडासुपर – ३० मिलि + बेस्टीकर- ५ मिलि प्रती पंपया प्रमाणात द्यावे . झाडच्या खोडाला प्लॅस्टिकचे आवरण लावावे, जेणेकरून मिलिबग वर चढणार नाही, मिलीबग हा मुंगळे जमिनीतून झाडावरती घेऊन जातात. त्यासाठी झाडाच्या खोडाला 2 फूट प्लास्टिकच्या कागदाने बांधून टाकावे. त्यामुळे मुंगळे वर जाणार नाहीत आणि मिलिबागचा प्रादुर्भाव कमी होईल.
फळमाशी नियंत्रण
फळमाशी ही आंब्याभराला जास्त घातक असते, त्यामुळे फळमाशीचे नियोजन करणे हे प्रामुख्याने महत्त्वाचे आहे . फळमाशी हि प्रामुख्याने फळाला साखर उतरल्यानंतर म्हणजे फळाला गोडी आल्यानंतरच फळावर बसते आणि फळाला डंक करते त्यामुळे फळ खराब होते. फळमाशी ही सायंकाळी अटॅक करते, त्यामुळे शेतात लाईट ट्रॅप लावा
एकरी 4 त्यामुळे 40ते 50% याचा फरक पडू शकतो, त्यानंतर फळमाशी नियंत्रण पांडासुपर – ३० मिलि किंवा सरेंडर – २५ मिलि+ बेस्टीकर – ५ मिलि ची फवारणी घ्यायची हे फवारणी शक्यतो सायंकाळी घ्यावी आणि त्यामध्ये चिकट गुळ जर 200 लिटर पाण्यात एक किलो जर वापरला तर फळमाशीचे नियंत्रण चांगलं मिळालं.
फळगळ
आंब्या भारामध्ये(Santra Ambia Bahar) फळगळ ही मोठ्या प्रमाणात होत असते आणि त्याचबरोबर सलाडणे हे जास्त होत असते . सलाडण्याचे दोन रोग आहेत , फळगळ ही फायटोक्लोरा आणि क्लोरोट्रॉपिकल या बुरशीमुळे होत असते. या दोन्ही वेगवेगळ्या दिसतात त्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी
फायटोपथेरा रासायनिक नियंत्रण
रिडोमिल गोल्ड-४० ग्रॅम/ कॅब्रिओ टॉप-४० ग्रॅम / अलिएट-३० ग्रॅम / नेटीओ – १० ग्राम प्रती पंप कॉपर ऑक्झीक्लोराइड / कॉपर हायड्रॉक्साइड -० कवच- २० ग्राम / व्हिम सुपर- ४० ग्राम / एम-४५-४० ग्राम / कुमान-एल- ४५ मिली + ००:५२:३४- १०० ग्राम प्रती पंप प्रमाण
फायटोपथेरा जैविक नियंत्रण
चांगल्या कुजलेल्या शेणखताबरोबर ट्रायकोबूस्ट डीएक्स एकरी २ किलो + कार्बारीच १ किलो मिक्स करून झाडाभोवती टाकावे .सुडोमोनस- ७५ + बॅसिलस सबस्टॅलिस – ४० मिली – फवारणी करावी (प्रमाण प्रती पंप ) सप्टेंबर पर्यंत दर अमावस्येला वापरणे गरजेचे आहे, त्यानंतरस्पोरप्लस – १०० ग्रॅम + पीएफ ०८ – १०० ग्रॅम + कार्बारीच – ४०० मिली फवारणी व आळवणीसाठी २०० लिटर पाण्यात सुडोमोनस- १ किलो + बॅसिलस सबस्टॅलिस – 500 मिली फवारणी व आळवणीसाठी २०० लिटर पाण्यात वापरावे त्यानंतर
बोर्ड पेस्ट
बोर्डो पेस्ट झाडाच्या खोडाला केलीच पाहिजे. बोर्डो पेस्ट वापरण्याची वेळ व पद्धत जून व सप्टेंबर या महिन्यात झाडांना बोर्डो पेस्ट करणे अनिवार्य आहे. मोरचूद – १ किलो + कळीचा चुना – १ किलो + १० लिटर पाणी याचे फायदे कॉपर ची कमतरता भरून काढते फायटॉ पथेराच्या जिवाणूचे नियंत्रण करते.
या पद्धतीने आंबे आभाराचे (Santra Ambia Bahar) नियोजन करावे.