Integrated Pest Management : एकात्मिक कीड व्यवस्थापन.

एकात्मिक कीड व्यवस्थापन (Integrated Pest Management) हा शेतीतील कीड नियंत्रणासाठी सर्वसमावेशक आणि पर्यावरणीयदृष्ट्या टिकाऊ दृष्टीकोन आहे. यामध्ये विविध धोरणांचा समावेश आहे, ज्यात लागवड नियंत्रण, यांत्रिक नियंत्रण आणि या परिचयाचा केंद्रबिंदू आहे.

(Integrated Pest Management) नैसर्गिक कीड नियंत्रण यंत्रणा वाढविण्यासाठी हिरवळीची खते, सेंद्रिय खते आणि आंतरपीक यासारख्या पद्धतींचा वापर करते. शिवाय, भक्षक कीटक आणि परजीवी वेस्प्स सारख्या फायदेशीर जीवांच्या अंमलबजावणीमुळे कीटकांचे व्यवस्थापन करण्यासाठी सुरक्षित, बिनविषारी आणि दीर्घकालीन उपाय मिळतो. ही प्रस्तावना I (Integrated Pest Management) च्या विस्तृत चौकटीत जैविक कीटक नियंत्रणाचे फायदे शोधते.

मशागतीय नियंत्रण :

हिरवळीचे व शेणखतांचा वापर, उन्हाळ्यात जमिनीची खोलवर मशागत, पेरणी वेळेवर, बियाण्याचे प्रमाण शिफारशीपेक्षा १० ते २० टक्के जादा, खतांच्या मात्रा शिफारशी व जमीन तपासणी अहवालानुसार, शेण, पालापाचोळा, पिकाचे अवशेष कुजविण्यासाठी अणुजीवांचा वापर सेंद्रिय खताचा तसेच जैविक खतांचा वापर, जैविक किडनाशकांची बीजप्रक्रिया, आंतर व मिश्रपीक पद्धतीचा वापर शिफारशी व गरजेनुसार पाण्याच्या पाळ्या मातीची भर निंदणी, आंतरमशागत, वेळेवर पिकाची काढणी व पिकाचे अवशेष शेतातच कुजविण्याची क्रिया केल्याने निसर्गत: किडींचे नियंत्रण होत.

कार्यप्रणालीय नियंत्रण :

पिकावरील पाने खाणाऱ्या व फळे पोखरणाऱ्या अळ्यांचे नियंत्रणासाठी ही प्रभावी पद्धत आहे. पीक ३०-४० दिवसाचे झाल्यावर पानावर बारीक हिरवट अळ्या आढळतात. किडग्रस्त पाने जाळीदार अर्धवट सुकल्यासारखी दिसतात. त्याखाली केसाळ अळ्या किंवा पाने खाणाऱ्या अळ्या ५-७ दिवस झुंडीत राहून नंतर शेतात पसरू लागतात. या अळ्या १ सें.मी. पेक्षा लहान असतांनाच पानासकट गोळा करून केरोसिन मिश्रीत पाण्यात झटकून माराव्यात म्हणजे पुढे त्यांचा उपद्रव होत नाही.

वांगी, भेंडी व इतर किडग्रस्त फळे शेतात तथा इतरत्र उघड्यावर न टाकता त्याचे छोटे ढिग करून त्यावर दोन इंच मातीचा थर दिल्यास फळातील अळ्या मरून उपद्रव मोठ्या प्रमाणात कमी होतो. किडक्या फळांतून किडीचे पतंग बाहेर येऊन किडीचा जीवनक्रम सुरु राहिल्याने पिकाचे नुकसान होते. किडकी फळे जाळण्याचा प्रयत्न केला तरी उष्णतेने अळ्या मरून कीड कमी होते.

Integrated Pest Management : कार्यप्रणालीय (मेकॅनिकल) नियंत्रण
एकात्मिक कीड व्यवस्थापन(Integrated Pest Management)

जैविक कीड नियंत्रण :

जैविक कीड नियंत्रण ही पर्यावरणासाठी सुरक्षित, विषरहित अन्न देणारी, निर्यात योग्य किफायतशीर व दिर्घ काळ काम करणारी अशी उत्कृष्ट कीड नियंत्रण पध्दत आहे. निसर्गातील ९८% किडींचे नैसर्गिकरीत्या नियंत्रण होत असून, उर्वरित फक्त २% किडींच्या नियंत्रणासाठी विविध उपाय योजावे लागतात. मात्र खालील परिस्थितीमध्ये जैविक नियंत्रणाशिवाय पर्याय नाही.

 • मालाच्या आयातीद्वारे परदेशातून नकळत एखादी किड आपल्या देशात दाखल होणे.
 • किडीचे नियंत्रण करताना अथवा नैसर्गिक आपत्तीमुळे निसर्गाचा समतोल बिघडून किडींच्या वाढीस अनुकूल वातावरण तयार होणे.
 • कीडनाशक प्रतिकारक किडींचा उद्रेक वाढणे, तसेच खाद्य पिकावर किडनाशकांचे अवशेषांची हानिकारक मात्रा राहणे.
 • कीड नियंत्रणाच्या इतर उपायाद्वारे समाधानकारक नियंत्रण होत नसल्यास त्यांची जैविक नियंत्रणाबरोबर सांगड घालूनएकात्मिक कीड व्यवस्थापन करणे.

किडींवरील परोपजीवी अथवा परभक्षी कीटक किंवा अन्य प्राणी आणि रोगजंतूचा वापर करून किडींची संख्या आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या खाली नियंत्रित करणे म्हणजे जैविक नियंत्रण होय. एक हंगामी पिकांपेक्षा बहुहंगामी आणि फलोद्यान पिकांत किडींचे नैसर्गिक शत्रू सहज प्रस्थापित होतात.

पिकांवरील किडींचे जैविक पद्धतीने नियंत्रण करताना त्या भागातील वातावरण, पीक पद्धती आणि महत्वाच्या उपद्रवी किडींच्या जीवनक्रमाबाबत अभ्यास करुन इतर प्रदेशात तत्सम वातावरण आणि पीक पद्धती असलेल्या भागात सदर किड कोणत्या कारणांनी नियंत्रणाखाली आहे, हे शोधणे गरजेचे असते. किडींचे नैसर्गिक शत्रू निसर्गतः किडीची संख्या नियंत्रित करत असल्यास असे जैविक घटक प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणात उत्पादन करून त्या किडीचा उद्रेक झालेल्या भागातील पिकावर त्यांचे प्रसारण करण्यात येते. अशा प्रकारे किडीचे नैसर्गिक शत्रू वातावरणात प्रस्थापित झाल्यास ते किडींची संख्या कित्येक वर्ष आर्थिक नुकसान संकेत पातळीखाली ठेवतात. जैविक घटक प्रस्थापित झाल्यानंतर किंवा नियंत्रण प्रकल्प राबविताना अणुजीवयुक्त किडनाशकांबरोबर अधुनमधुन काही निवडक रासायनिक किडनाशके वापरली तरी चाल- तात, मात्र किडींचे परोपजीवी आणि परभक्षी कीटक अथवा इतर प्राण्याद्वारे जैविक नियंत्रण करावयाचे असल्यास रासायनिक किडनाशकांचा वापर टाळावा.

सध्या अनेक जैविक घटकांपैकी परोपजीवी कीटक, परभक्षी कीटक आणि रोगजंतुयुक्त जैविक किडनाशके बाजारात उपलब्ध आहेत. कीड व्यवस्थापनासाठी परिणामकारक जैविक घटक पुढील तक्त्यात दिलेले आहेत. हे जैविक घटक प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणात उत्पादन करून त्यांचा वापर पिकांवरील महत्वाच्या किडींचे जैविक नियंत्रणासाठी करता येतो.

बहुपीक भक्षी घाटे अळीच्या नियंत्रणासाठी हेलिओकिल

घाटे अळी (हेलिकोव्हर्पा) ज्वारी, हरभरा, तूर, कपाशी, सूर्यफूल, मका, टोमॅटो, करडई या पिकांचे नुकसान करते. अळी रंगाने हिरवट, पिवळसर, तांबूस तपकिरी किंवा काळपट असते. अळी अवस्था पिकांचे नुकसान करते. अलिकडे ही अळी मोठ्या प्रमाणात दिसून येते. किटकनाशकांच्या बेसुमार वापरामुळे या किडीमध्ये किटकनाशकांविरुद्ध प्रतिकारक्षमता निर्माण होते. परंतु निसर्गात या किडीस न्युक्लिअर पॉलिहैड्रॉसिस या विषाणूमुळे रोग होऊन ती मरते.

या विषाणूचे संक्षिप्त नाव एच. ए. एन. पी. व्ही. असे आहे. हा विषाणू घाटे अळीस नैसर्गिकरित्या होतो. परंतु त्याचे प्रमाण अत्यल्प असते. प्रयोग शाळेत घाटे अळ्यांचे संगोपन करून त्यांना रोगग्रस्त करून या विषाणूचे उत्पादन करता येते. या विषाणूच्या पिकावर फवारणीनंतर घाटे अळी लहान असताना रोगाची लागण होऊन ३-४ दिवसात मरते. अळी मोठी झाल्यावर विषाणूद्वारे होणाऱ्या रोगामुळे अळी मरण्यास एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधी लागतो. दिवसा ऊन असल्यास फवारणी तिसऱ्या प्रहरी सुरू करून संध्याकाळपर्यंत करावी.

रस शोषणाऱ्या किडींच्या जैविक नियंत्रणासाठी लेकॅनीसीलम लेकॅनी बुरशीचा वापर.

फुले बगीसाईड हे जैविक कीडनाशक असून ते द्राक्ष, डाळिंब, सिताफळ, आंबा, फुलझाडे, हरित गृहातील पिके, भाजीपाला इ. पिकांवरील पिठ्या ढेकूण, पांढरी माशी, मावा, तुडतुडे, फुलकीडे, खवले कीड या रस शोषणाऱ्या किडीं प्रभावी नियंत्रण करते. त्यामध्ये लेकॅनीसीलम लेकॅनी ही बुरशीची स्थानिक प्रजात जैविक घटक म्हणून सुमारे १० कोटी बिजकण प्रति ग्रॅम या प्रमाणात असते. हे जैविक किडनाशक प्रभावीपणे कार्य करावे म्हणून खालील बाबी लक्षात घ्याव्यात.

 • १. या जैविक किडनाशकाच्या वाढीस ७५ टक्केपेक्षा जास्त आर्द्रतेची आवश्यकता असल्यामुळे पावसाळ्यात प्रभावीपणे कीड नियंत्रण होते.
 • २. हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात कोरडे हवामान असल्यामुळे फुले वर्गीीसाईड रात्रभर पाण्यात भिजवावे. फवारणी अगोदर पिकास भरपूर पाणी द्यावे. फवारणीचे वेळी प्रति २०० लिटर पाण्यात १ किलो बगीसाईड + १ लिटर दूध मिसळावे. फवारणीनंतर २ दिवस तिसऱ्या प्रहरी पाणी फवारावे. पुन्हा १० ते १५ दिवसांच्या अंतराने २-३ फवारण्या कराव्यात. साधारणतः ३-४ आठवड्यात किडीचे प्रमाण कमी होते.
 • ३. कॉपर ऑक्सीक्लोराईड, कॉपर हैड्रॉक्साईड, गंधक, बोर्डो मिश्रण यांचा लेकॅनिसीलीअम लेकॅनी या जैविक बुरशीच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होत नाही. मात्र इतर रासायनिक बुरशीनाशके फुले बगीसाईड फवारल्यानंतर एक आठवड्याने फवारावीत. तसेच रासायनिक बुरशीनाशकाच्या वापरानंतर एक आठवड्याने फुले बगीसाईड वापरावे.
 • ४. रस शोषणाऱ्या किडींना या बुरशीमुळे रोग होऊन बुरशीने सोडलेल्या विषामुळे किडी मरतात. कोणतेही जैविक कीडनाशक वापरल्यानंतर फवारणीनंतर १-२ दिवसात पिकाचे नुकसान थांबते. मात्र किडी तीन दिवसानंतर मरतांना आढळतात. किडींना आजार झाल्यामुळे त्या किडीही झाडाच्या वरील भागात गोळा होतात. त्यामुळे कीड वाढल्याचा गैरसमज होतो.
 • ५. फुले बगीसाईड परभक्षी किटकांना सुरक्षित आहे.

कामगंध (फेरोमोन) सापळ्याचा कीड व्यवस्थापनासाठी उपयोग

कीटक स्वजातीयांशी सुसंवाद साधण्यासाठी स्वतःच्या शरीरातून विशिष्ट गंध असलेल्या रसायनाचे मिश्रण बाहेर सोडतात. ही रसायने त्यांच्यामध्ये विशिष्ट प्रतिक्रिया निर्माण करून संदेशवाहनाचे कार्य करतात, यांना कामगंध (फेरोमोन) असे म्हणतात. सध्या काही कीटकांचे कृत्रिमरित्या तयार केलेले फेरोमोन्स विक्रीसाठी बाजारात उपलब्ध आहेत. समागमासाठी कार्यक्षम सहचर शोधण्यासाठी कामगंधाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. याच्या गंधाने विरुद्धलिंगी

कीटक परस्परांकडे मिलनासाठी आकर्षित होतात. याचा उपयोग आपल्याला खालील कारणासाठी करता येतो.

 • १. सापळ्यांद्वारे किडींचे सर्व्हेक्षण करणे
 • २. मोठ्या प्रमाणात किर्डीचे पतंग सापळ्यात पकडून त्यांचा नाश करणे.
 • ३. किटकांच्या मिलनात अडथळा निर्माण करून पुनरुत्पत्तीला अटकाव करणे.

विविध पिकांमध्ये कीड नियंत्रणाची कार्यवाही सुरू करण्यासाठी कामगंध सापळ्याचा मुख्यतः उपयोग केला जातो. सर्वेक्षणासाठी एक हेक्टर क्षेत्रात ५ सापळे पुरेसे आहेत. पीक संरक्षणाचे उपाय सुरू करण्यासाठी सापळ्यात कमीत कमी किती पतंग अडकले पाहिजेत, याची संख्या निश्चित केलेली असते. उदा. प्रत्येक सापळ्यात घाटेअळीचे सरासरी ८ ते १० पतंग सतत २-३ दिवस आढळून आले, तर किडीच्या नियंत्रणाचे उपाय त्वरित योजणे आवश्यक ठरते.

किडींचे प्रमाण जेव्हा अत्यल्प असते, अशा वेळी पतंग पकडण्यासाठी कामगंध सापळ्यांचा उपयोग होऊ शकतो. यासाठी एक हेक्टर क्षेत्रात १० ते १२ कामगंध सापळे बसवून मोठ्या प्रमाणात पतंग पकडले जातात व पुढील प्रजनन कमी करण्यास मदत होते. कीटकांच्या मिलनात अडथळा निर्माण करण्यासाठी सापळ्यातून लिंग प्रलोभन रसायनाचा सूक्ष्म गंध पसरतो. त्यामुळे मिलनासाठी सहचर शोधतांना किटकांची फसगत होते. परिणामी त्यांचे मिलन न झाल्यामुळे प्रजोत्पादन होत नाही. त्यामुळे पुढील पिढीतील किटकांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येते. सध्या बाजारात घाटेअळी, सोयाबीनवरील स्पोडोप्टेरा अळी, वांगी, भेंडी, कोबी, ऊस, कपाशीवरील अंगा, फळमाशीचे कामगंध सापळे उपलब्ध आहेत. त्यांची किंमत रु. ५० ते १२५ प्रति सापळा आहे. कामगंध २ ते ३ आठवड्यात बदलतात त्यांची किंमत १० से ५० प्रति गंध असते.

साठविलेल्या धान्यावर पडणाऱ्या किडी व त्यांचे नियंत्रण

साठवणुकीतील धान्यात निरनिराळ्या किडीचा उपद्रव होतो. यात प्रामुख्याने टोके, छोटे भुंगेरे, खापरा, पिठातील तांबडा भुंगेरा, दातेरी कडाचे भुंगेरे, धान्यावरील पतंग, तांदळावरील पतंग, गव्हावरील पतंग, पिठातील पतंग, कडधान्यावरील मुंगेरे, इ. किडी आढळतात. त्याशिवाय साठविलेल्या धान्याचे उंदरापासून अतिशय नुकसान होते.

साठविलेल्या धान्यातील किडीचा प्रादुर्भाव मुख्यत्वेकरून त्यात असलेल्या ओलाव्याच्या प्रमाणावर अवलबून असतो. साठवणीसाठी धान्यातील ओलावा १०% पेक्षा कमी राहील अशी काळजी घ्यावी. त्यासाठी धान्य उन्हात चांगले वाळवावे. पावसाळी वातावरणामुळे ऊन देणे कठीण जाते. अशा परिस्थितीत मात्र कृत्रिमरित्या पाना वाळविण्यासाठी यंत्राचा उपयोग करता येतो. धान्यातील किडींचा प्रादुर्भाव दरवाजे, भिंती, खिडक्या यातील फटीतून रिकाम्या तसेच धान्य साठविण्यासाठी वापरलेल्या पोत्यातून होतो. धान्य भरण्याअगोदर पोत्यावर मॅलाथिऑन ५०% प्रवाही कीटकनाशक २० मि. ली. २० लि. पाण्यात मिसळून फवारावे. धान्यामध्ये सेलफॉस गोळी ३ ग्रॅम / किंटल किंवा बोरिक भुकटी १० ग्रॅम / किग्रॅ. या प्रमाणात बंद कोठीत वापरावे. धान्यात वाळलेली कडुनिंबाची पाने धान्याच्या १% प्रमाणात मिसळावी. बियाण्याच्या वापरामध्ये कडधान्यात ५-१० ग्रॅम वेखंड भुकटी / कि. ग्रॅ. किंवा राख मिसळावी. डेल्टामेथ्रीन ४ मिलि ५०० मिलि पाण्यात मिसळून १०० किलो व चोळावे किंवा डेल्टामेथ्रीन २.५% पाण्यात विरघळणारी भुकटी २.५ ग्रॅम / कि. ग्रॅ. यामागे वियात मिसळावी.

फळे व भाजीपाल्यातील कीडनाशक अवशेष (अंश) व्यवस्थापन

बदलत्या हवामानामुळे किडी व रोगांच्या समस्या वाढल्या आहेत. कीड व रोगापासून पिकांचे सरक्षण करण्यासाठी शेतकरी विविध कीडनाशकांचा वापर करीत आहेत. कीडनाशकांचा विवेकपूर्ण वापर न झाल्यास त्यातून पर्यावरणास धोका संभवतो तसेच शेतमालाच्या निर्यातीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. विविध देशांनी अनपटकातील कीडनाशक अवशेषांच्या कमाल मर्यादा (एम. आर.एल.) ठरवून दिल्या आहेत. शेतमालातील कीडनाशक अवशेष कमाल अवशेष मर्यादेपेक्षा (एम.आर.एल.) कमी व देशातून होणाऱ्या कृषीमालाच्या निर्यातीतील प्रमुख अडसर दूर होऊन निर्यातीत वाढ होईल यासाठी खालील मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा.

 • १) अधिकृत (केंद्रिय कीडनाशक मंडळ व नोंदणी समिती) शिफारशीनुसार किडनाशकांचा वापर करावा. शिफारस केलेला काढणीपूर्व कालावधी उलटल्यावरच पिकाची काढणी करावी कीडनाशक उत्पादनाचे लेबल क्लेम्स काळजीपूर्वक वाचावेत.
 • २) कीडनाशक फवारणीपूर्वी किडीची संख्या / आर्थिक नुकसान पातळी विचारात घेऊन आवश्यक असेल तरच फवारणी करावी. रासायनिक किडनाशकाचा वापर पिकांच्या वाढीच्या सुरवातीच्या काळात करावा. पीक काढणीच्या काळात वनस्पतिजन्य किडनाशके तथा जैविक घटकांचा उपयोग करून एकात्मिक कीड व्यवस्थापन संत्रानुसार पीक संरक्षण करावे.
 • (३) फळे व भाजीपाला काढणीयोग्य झाल्यावर म्हणजे काढणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर रासायनिक किडनाशकाची फवारणी बंद करावी त्याऐवजी जैविक कीडनाशके वापरावीत.
 • (४) मानवी आरोग्यास व पर्यावरणास कभी हानिकारक असलेली, तसेच कमी मात्रामध्ये अधिक परिणामकारक कीड नियंत्रण
 • करणारी निवडक किडनाशके वापरावीत. बापरावर बंदी असलेली किडनाशके वापरु नयेत.
 • ५) निर्यातीपूर्वी शेतमालाची कीडनाशक अंश चाचणी करून अंश नसल्याची खात्री करावी व मगच निर्यात करावी.
 • ६) एकाच गटातील किडनाशकाचा वापर न करता वेगवेगळी कोडनाशके वापरावीत.
 • ७) किडनाशकांच्या फवारणीनंतर पाळावयाचा प्रतीक्षा कालावधी संबंधित कीटकनाशकांच्या वेष्ठणावर तथा माहिती पत्रिकेवर नमुद केलेले असतात. त्याचे पालन करावे.

हे पण वाचा, तुम्हांला नक्की आवडेल…

Santra Ambia Bahar : संत्रा बागेत आंबिया बहार घेताना या गोष्टी लक्षात ठेवा.

Plant Nutrition : वनस्पतींमधील अन्नद्रव्य, कार्ये, कमतरतेची लक्षणे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top