Mrug Bahare 2023 : असे करा संत्रा मृग बहाराचे नियोजन.

[ez-toc]

Mrug Bahare2023 बाग तानावर सोडणे

Mrug Bahare 2023 बाग तानावर सोडण्या अगोदर झाडाला शेणखत ,रासायनिक खत व जयवीक खताचा ढोस भरून भरपूर पाणी सोडूनच बाग तणावरती सोडायची आहे बाग ताणावर सोडल्यानंतर १ ते १.५ महिन्यांनी हलकीशी पाळी टाकली तरी चालते.

बाग तानावर आलेला कसा ओळखायचा ?

 Mrug Bahare 2023 बाग तानावर आलेला
बाग तानावर आलेला

यामध्ये दोन प्रकार दिसून येतात एक तर ती म्हणजे झाडाचे पान पिवळे होऊन खाली पडायला सुरुवात होतात आणि दुसरी म्हणजे झाडामध्ये ताकत असेल तर पानाचा रंग जास्त पिवळा न पडता पान गुंडाळायला चालू होतात पण पानाचा रंग हिरवा राहून जास्त सुकत नाही त्याला चांगला ताण आहे असे समजले जाते . झाडाची पाने जास्त गळली म्हणजे ताण नाही कारण झाडाला काही अन्नद्रव्याची कमतरता किंवा सूक्ष्म अन्नद्रव्याचा अभाव असल्यामुळे ही झाडाची पान लवकर पिवळी पडून गळतात आणि आपण समजतो बाग ताणावर आला पण तसे नसते तर झाडाला सूक्ष्म अन्नद्रव्य, मुख्य अन्नद्रव्य ,तसेच दुय्यम अन्नद्रव्याची कमतरता असली तरी झाडाची पाने गळतात ती कोणत्या कारणांनी गळतात त्याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे .

जास्त तानावर बाग आली आणि पाऊस पडण्यास वेळ लागत असाल तर बागेची कोणती काळजी घायची ?
जास्त तानावर जर बाग आली आणि पाऊस येण्याला वेळ लागेल असे वाटले तर जी झाडे जास्त सुकतात त्या झाडाला पाईपने झाडाला थोडे पाणी दयावे किंवा आपल्याकडे ड्रीप असेल तर ड्रीप द्वारे अर्धा तास पाणी सोडावे त्यामुळे झाड जास्त तानात जाण्याची शक्यता असते ती होणार नाही. त्यानंतर दुसरे पाणी हे जूनच्या पहिल्या आठवडयात देताना हे दीड ते दोन तास दयायचे आणि त्यानंतर तिसरे पाणी हे दोन ते अडीच तास द्यायचे आहे.

Mrug Bahare 2023 खत व्यवस्थापन

बागेला सुरुवातीला शेणखत आणि सुपर फास्फेट द्यायचे आहे त्यानंतर चांगला पाऊस झाल्यानंतर 10/ 26 /26 ५००ग्राम , मायक्रो न्यूटन १०० ग्राम हे प्रति झाड १००ग्राम मॅग्नेशियम, 50ग्राम झिंक, ५० ग्राम फेरस, अशी रासायनिक खताची मात्रा द्यायची आहे

जैविक खते

जैविक खते हि जी आपण रासायनिक खत देतो त्याचे विघटन करून ती झाडाला लागू करून देण्यास मदत करतात . जैविक खते हे शक्यतो शेणखतात मिसळूनच द्यायचे आहे जेणेकरून त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. जैविक खत ( जिवाणू ) चा एन.पी.के खते किंवा मायक्रो न्यूटन जी देतोय ते तुमच्या जमिनीत पडून राहतात ती पिकाला लागू होतात. जैविक खतामुळे झाडांमध्ये चैतन्य टिकून राहते व झाड सुडोल राहते.

किड आणि रोग व्यवस्थापन

संत्रा बागेत सुरुवातीला नवीन पालवी फुटते त्या वेळेस पानावरती नाग अळी दिसून येते. नाग आळी आणि नाग अळीचे अंडे घालणारा सोनेरी कलर असणारी माशी दिसून येते ती माशी पानाच्या लेयरच्या मध्यभागी अंडी घालते आणि त्यामधून जन्माला जी पिल्ले असतात ती नागअळी असते ती पानांमध्ये फिरते त्यामुळे पानाचा पूर्ण चुरडा होऊन जातो त्याचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी क्यानॉन दोन मिली प्रति लिटर हे सकाळी सकाळी लवकर फवारणी करायची आहे. नाग अळीची माशी ही शक्यतो सकाळीच पानावर असते.

त्यानंतर सायट्रस सायला

Mrug Bahare 2023 सायट्रस सायला
सायट्रस सायला

याचा प्रादुर्भाव दिसून येतो त्याच्या नियंत्रणासाठी सायट्रस सायला नियंत्रण रिहांश २० मिली ,THIAMETHO 30+सरेंडर ३० + मिली+स्टिकर बेस्टीकर ७ मिली याचा वापर करावा.

Mrug Bahare कोळी प्रादुर्भाव नियंत्रण

कोळीचा प्रादुर्भाव हा शक्यतो वातावरणात 30 ते 35 टेंपरेचर असतानाच दिसून येतो. कोळीचा प्रादुर्भाव पानावरती पिवळे डाग दिसून येतो किंवा फळावरती खरडल्यासारखे काळे डाग दिसून येतात . कोळीचा प्रादुर्भाव हा आंबिया बहारात पण दिसून येतो त्याचा प्रादुर्भाव (Vellow Mites) नियंत्रणासाठी-सल्फाबूस्ट -30 ग्रॅम+ETN सुपर-30 मिली किंवा / ओमाइट -30 मिली मॅजिस्टर -15 मिली व्हर्टिसिलीयम – 75 मिली
प्रती पंप प्रमाण फवारणी करायची आहे.

 Mrug Bahare 2023 फुलकिडी आणि मावा

 Mrug Bahare 2023 मावा
मावा
Mrug Bahare 2023 फुलकिडी (trips)
फुलकिडी (trips)

नियंत्रणासाठी– रिहांश -20 मिली / डिझायर – 30 मिली प्रती पंप प्रमाण, रेज -15 मिली फवारणी करायची.

संत्रा वरील कोळशी माशी

Mrug Bahare 2023 संत्रा वरील कोळशी माशी
संत्रा वरील कोळशी माशी

कोळशी माशी ही काळी रंगाची असते तिच्यावरून थोडेसे कवच असते ती आतल्या पानाला डउष करते आणि तिची विस्टा खालच्या पानावर पडते आणि त्या पडलेल्या विस्टेवरती हवेतले बुरशी येते आणि सर्व पान हे काळे दिसते त्याला आपण कोळशी असे म्हणतो त्याचे नियंत्रणासाठी रिहांश २५ ,THIAMETHOL 30% ,FS+सरेंडर 25 मिली+बेस्टीकर ५ मिली

डिंक्या रोग

Mrug Bahare 2023 <yoastmark class=

डिंक्या रोगासाठी पाणी हे झाडाच्या खोडाजवळ सोडायचे नाही  . झाडाच्या खोडापासून एक फूट लांब असावा डिंका रोग आला असेल तर त्या ठिकाणी तो खरडून काढायचा आहे आणि त्यानंतर त्याला बोर्ड पेस्ट करायची आहे ट्रायकोची पेस्ट तयार करा किंवा रेडोमील गोल्ड किंवा कॅब्रेओटॉप ची पेस्ट करून ते लावायचे आहे त्याने डिंक्या रोगाचे नियंत्रण होण्यास मदत होईल.

फायटोपथेरा नियंत्रण

Mrug Bahare 2023 फायटोपथेरा
फायटोपथेरा नियंत्रण

Mrug Bahare फायटोपथेरा नियंत्रण करणे कठीण आहे. जमिनीतून पसरणारा रोग असल्या कारणाने त्याला नियंत्रित नर्सरीतील रोपांची निवड व रोग प्रतिकारक्षम खुंटांची निवड करा.

फायटोपथेरा रासायनिक नियंत्रण

रिडोमिल गोल्ड-४० ग्रॅम/ कॅब्रिओ टॉप-४० ग्रॅम / अलिएट ३० ग्रॅम / नेटीओ – १० ग्राम प्रती पंप प्रमाण,कॉपर ऑक्झीक्लोराइड/कॉपर हैड्रोकसाइड ४० ग्राम + कवच-२० ग्राम /व्हिम सुपर- ४० ग्राम / एम-४५-४० ग्राम / कुमान – एल- ४५ मिली + ००:५२:३४- ७० ग्राम प्रती पंप ची आलटून पालटून फवारणी करायची

Mrug Bahare 2023 फायटोपथेरा जैविक नियंत्रण

चांगल्या कुजलेल्या शेणखताबरोबर ट्रायकोबूस्ट डीएक्स एकरी १ किलो + कार्बारीच १ किलो मिक्स करून झाडाभोवती शेणखतात मिसळून टाकावे सप्टेंबर पर्यंत दर अमावस्येला वापरणे गरजेचे आहे.

फायटोपथोरा साठी जैविक फवारणी आणि आळवणी :स्पोरप्लस- १०० ग्रॅम+ पीएफ ०८- १०० ग्रॅम + कार्बारीच – ४००मिली फवारणी व आळवणीसाठी २०० लिटर पाण्यात वापरावे. सडोमोनस- १ किलो + बॅसिलस सबस्टॅलिस- ४०० मिली फवारणी व आळवणीसाठी २०० लिटर पाण्यात वापरावे.

हे पण वाचा..  Santra Ambia Bahar : संत्रा बागेत आंबिया बहार घेताना या गोष्टी लक्षात ठेवा

Pigeon pea : तुरीची लागवड करताना कोणती काळजी घ्यावी?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top