[ez-toc]
खरीप हंगामामध्ये तूर(Pigeon pea) हे अतिशय महत्वाचे कड धान्यपीक आहे. महाराष्ट्र राज्यात तूर पिकाचे क्षेत्र ११.९५ लाख हेक्टर, उत्पादन १०.५४ लाख टन, उत्पादकता ८८२ किलो/ हेक्टर अशी होते
जमीन
मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकाकरिता योग्य असून चोपण, पाणथळ जमिनीत हे पीक चांगले येत नाही. कसदार, भुसभुशीत, पोयट्याच्या जमिनीत सुध्दा तूर चांगली येते. जमिनीत स्फुरद,पालाश झिंक , गंधक ची कमतरता नसावी. साधारणतः ६.५ ते ७.५ सामू असलेली जमीन या पिकास योग्य असते. तसेच जमिनीचा सेंद्रिय ०.५ पेक्षा जास्त असावा.
पूर्वमशागत
उन्हाळ्यात चांगली खोल नांगरट करावी आणि पाऊस पडण्या आगोदर पाळी टाकून जमिनीची हावरी करूनयाच वेळी हेक्टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे. जमीन चांगली तापू द्यावी. त्यामुळे जमिनीतील किडी, अंडी व कोष इ. नष्ट होतात. जमीन चांगली तापल्यामुळे सच्छिद्रता वाढते. अन्नद्रव्ये मुक्त होतात आणि जमिनीचा पोत सुधारतो. मान्सूनचा पाऊस झाल्यावर वाफसा येताच कुळवाची पाळी देऊन काडी कचरा स्वच्छ वेचून जमीन पेरणीसाठी तयार ठेवावी.
योग्य वाणांची निवड
[table id=3 /]
या वाणांची लागवडीसाठी निवड करावी.
पेरणीची वेळ
तुरीची (Pigeon pea) पेरणी वेळेवर होणे आवश्यक आहे. पहिल्या पावसानंतर शेत चांगले तयार करावे. काडी कचरा वेचून स्वच्छ करावे. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात पेरणी करावी. पेरणी जसजशी उशिरा होईल त्याप्रमाणे उत्पादनात घट येते. यासाठी १० जुलैपूर्वी
पेरणी करावी.
आंतरपिके
तूर (Pigeon pea) हे पीक बहुतांशी आंतरपिक म्हणून घेतले जाते.
[table id=4 /]
अशाप्रकारे पेरणी केल्यास दोन्ही पिकांचे उत्पादन चांगले येते. तूरीचे सलग पीक सुद्धा चांगले उत्पादन देते. तूरPigeon pea)-सोयाबीन आंतरपीक २:४ किंवा १:६ प्रमाणात खरीप हंगामात पेरून सलग पद्धतीने पेरणी करावी.
पेरणीचे अंतर
सलग पीक घ्यावयाचे असल्यास आय.सी.पी.एल-८७ या लवकर तयार होणाऱ्या वाणाकरीता ४५ x १० सें.मी. अंतर ठेवावे, तर या मध्यम कालावधीच्या वाणाकरिता ६० x २० सें.मी. किंवा ९० x २० सें.मी. अंतर वापरावे. अलिकडे घेण्यात आलेल्या प्रयोगामध्ये अधिक अंतरावर पेरलेल्या तूर(Pigeon pea) पिकाचे आशादायक उत्पादन मिळाले आहे. म्हणून १८०४ ३० से.मी. किंवा ९०x६० से.मी. अंतरावर पेरणी करावी. १८०x३० से.मी. अंतरावर लागवड करून त्यात सोयाबीनच्या ३ ओळी आंतरपिक म्हणून ४५x५ सें.मी. अंतरावर लागवड करता येऊ शकते. सोयाबीन पीक लवकर निघून जाते. तसेच तुर व सोयाबीन दोन्ही पिकातून अधिक उत्पादन मिळू शकते. बियाणे प्रमाण
आय.सी.पी.एल – ८७ च्या पेरणीसाठी हेक्टरी २. ५ ते ३ किलो बियाणे लागते. मध्यम मुदतीच्या राजेश्वरी, विपुला व बी. डी. एन. – ७११ या वाणासाठी हेक्टरी ३ किलो बियाणे पुरते. उशिरा येणाऱ्या आणि जास्त अंतरावर लावावयाच्या यासाठी हेक्टरी ३ते ४ किलो बियाणे टोकण पद्धतीसाठी पुरेशे होते.
बीजप्रक्रिया
पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाणास ५ ग्रॅम ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करावी. यानंतर २५० ग्रॅम रायझोबियम व पी. एस. बी. जिवाणु संवर्धन १० किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे.
खत व्यवस्थापन
खत व्यवस्थापन करत असताना तुरीसाठी हेक्टरी २५ किलो नत्र ५० किलो स्फुरद म्हणजेच १२५ किलो डीएपी ,ह्यूमिक GR पेरणीचे वेळी द्यावे. पीक ५०%फुलोऱ्यात असतांना मायक्रोन्यूट्रीयन्ट इमामेक्टीन क्लोरोपायरीफॉसची फवारणी करावी. आंतरपिक असल्यास ज्या पिकाच्या ओळी जास्त त्या पिकाची शिफारस केलेली खतमात्रा द्यावी. उदा. सोयाबीन करीता ५० किलो नत्र आणि ७५ किलो स्फुरद अशी मात्रा द्यावी.
आंतर मशागत
पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी पहिली कोळपणी करावी. पुढे १५ दिवसांनी खुरपणी किंवा कोळपणी करावी. अधिक उत्पादनासाठी पीक पेरणीनंतर ३०-४५ दिवस शेत तणविरहीत ठेवावे. तणनियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर करावयाचा असल्यास पेरणीनंतर लगेच चापशावर (पुरेसा ओलावा) पेंडीमेथीलीन (स्टॉम्प प्लस) हे तणनाशक २.५ लिटर प्रति हेक्टरला ५०० लिटर पाण्यातून फवारावे. अधिक उत्पादनासाठी ४५ दिवसांनी शेंडा खुडण्याची क्रिया करावि शेंडा खुडल्यामुळेफांदयांची संख्या वाढते
पाणी व्यवस्थापन
तूर हे खरीप हंगामामधील पीक असल्यामुळे ते पावसावर वाढते. तथापि पावसामध्ये खंड पडल्यास किंवा पाण्याचा तान पडल्यास आणि सिंचनाची सुविधा असल्यास पिकास वाढीच्या अवस्थेमध्ये (३० ते ३५ दिवस), फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये
(६० ते ७० दिवस) आणि शेंगा भरावयाच्या अवस्थेमध्ये पाणी द्यावे. अथवा ठिबक सिंचनाने ५०% बापीभवनानंतर पाणी द्यावे. त्यामुळे पीक उत्पादनात अधिक वाढ होते.
तुरीचे पीक(Pigeon pea) संरक्षण
तुरीमध्ये फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये शेंगा पोखरणारी अळी (घाटेअळी), मका, पिसारी पतंग व शेंग माशी या किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे या किडींमुळे ३० ते ४० टके नुकसान होते. या किडींच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन या पद्धतीचा वापर करावा. तूर (Pigeon pea) या पिकात तृणधान्यांचे आंतरपिक घेतल्यास किडींचे प्रमाण कमी राहते. शेताच्या बांधावरील तुरीच्या शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांची पर्यायी खाद्य उदा. कोळशी, रानभेंडी, पेटारी ही तणे वेळोवेळी काढून नष्ट करावीत.
तूर (Pigeon pea) लागवडीच्या वेळी ज्वारीचे बियाणे २५० ग्रॅम / हेक्टरी जागोजागी लावावे. शेंगा पोखरणान्या अळीचा प्रादुर्भाव कळण्यासाठी व किडींच्या नियंत्रणासाठी पाच कामगंध सापळे/हेक्टरी लावावेत. शेतात पक्ष्यांना बसण्यासाठी मचाण म्हणजेच इंग्रजी टी आकाराचे पक्षी थांबे ५०-६० प्रती हेक्टर उभारावेत. पिकास फुलकळी येतांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी आर्कची फवारणी करावी .