Methods of Watering Crops : पिकांना पाणी देण्याच्या पद्धती

शेतात पाणी देण्याच्या अनेक पद्धती (Methods of watering crops) आहेत. त्या म्हणजे मोकाट पद्धत, सारे पद्धत, आळे पद्धत, सरी पद्धत, समपातळीत सरीतून पाणी देण्याची पद्धत,फवारणी पद्धत, जमिनीखालून पाणी देण्याची पद्धत ह्या होत. ह्या सर्व पद्धती आपापल्या परीने उपयोगी आहेत.

महत्त्वाची गोष्ट एकच आहे आणि ती म्हणजे एखाद्या भागात एक पद्धत सामान्य आहे म्हणून केवळ ती उपयोगात आणावयाची असे न करता ज्या पिकाला व जमिनीला पाणी द्यावयाचे असेल त्यांना ही योग्य आहे की नाही हे पाहून ती पद्धत उपयोगात आणली पाहिजे.

Methods of Watering Crops : पिकांना पाणी देण्याच्या पद्धती
Methods of Watering Crops : पिकांना पाणी देण्याच्या पद्धती

कोणती पद्धत वापरावयाची ते ठरविण्याच्या अगोदर ज्या जमिनीला पाणी द्यावयाचे असेल त्याची ठेवण व पाणी शोधून व धरून ठेवण्याची क्षमता पाहावयास हवी. पाणी देण्याच्या पद्धतीमुळे (Methods of Watering Crops) जमिनीचे संरक्षण होऊन पाणी वाया न जाता किंवा नुकसान न करता पिकाची गरज पुरविली जाईल हे पाहिले पाहिजे. असे करण्यासाठी योग्य पद्धत निवडणे आवश्यक व इष्ट आहे. ओलिताच्या निरनिराळ्या पद्धतींचे पुढे विवेचन केले आहे.

हे पण वाचा …Armyworm : मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

मोकाट पद्धत

Methods of Watering Crops : मोकाट पद्धत

ही सर्वांत जुनी व प्राचीन पद्धत आहे. ह्या पद्धतीत शेतात नाली काढून पाणी सर्व दिशांना बाहू देतात. पाणी सर्वदूर सारखे पोहोचावे म्हणून शेतकरी फावड्याने जी जागा कोरडी असेल तिकडे उंचावरील माती बाजूला पसरून पाणी वळवितो. ह्या पद्धतीत ( Methods of Watering Crops )वाहून जाम्यामुळे खोल रिम्यामुळे आणि बाष्पीभवनामुळे बरेचसे पाणी वाया जाते. ही सर्वात 3 अकार्यक्षम ओलिताची पद्धत असून त्यात उंचावरील जागा कोरडी राहते व सखोल जागेत खूप पाणी साचते व त्यामुळे पीक सर्व जागी सारख्या उंचीचे येत नाही व उत्पन्नही कमी येते. ज्यांच्याजवळ मुबलक पाणी आहे असे अनेक शेतकरी ही पद्धत अजूनही वापरतात कारण अशा प्रकारे पाणी देण्यासाठी खर्च कमी लागतो व कसबही लागत नाही.

सारे पद्धत

साधारणपणे जमिनीची 6 ते 18 मीटर रुंदीच्या आणि 30 व 150 मीटर लांबीच्या पट्ट्यात (सायात) विभागणी करून त्यातील जमीन सपाट करतात व सुमारे 30 सेंमी. उंच बांध पालून त्या पट्ट्यातून पाणी देतात. याला सारा पद्धत (Methods of Watering Crops) म्हणतात. महाराष्ट्रात साधारणतः सायाची लांबी व रुंदी बरीच जास्त ठेवतात. ज्या दिशेने पाणी देतात त्या दिशेनेच सान्यांना दर 30 मीटरला 10 ते 12.5 सेंमी. उतार देतात. सारे समपातळीत किंवा उताराप्रमाणे तयार करतात. त्यात कल्पना अशी आहे की 5 ते 75 सेंमी.

खोल पाणी चादरीप्रमाणे अरुंद पट्टीतून ढकलून दिले म्हणजे पुढे पुढे सरकत असताना जमिनीतही मुरेल. पट्ट्यांची (सायांची लांबी त्या सबंध पट्ट्या किती लवकर ओल्या होतात त्यावर अवलंबून राहते आणि ते जमीन किती लवकर पाणी शोषून घेते, त्याचा उतार किती आहे आणि पाटाच्या पाण्याचा प्रवाह किती मोठा आहे यावर अवलंबून असते. सुमारे 0.5 टक्के साधारण उतार आणि मध्यम पाटाच्या पाण्याचा प्रवाह असल्यास पट्ट्यांची लांबी खाली दिल्याप्रमाणे सुचविली आहे.

  • रेवट किंवा रेवट पोयट्याची जमीन -30 मीटर
  • मध्यम पोयट्याची जमीन -106 ते 90 मीटर
  • चिकट पोयटा किंवा चिकण मातीची जमीन 90 ते 150 मीटर

एका पट्ट्याला पुरेसे पाणी दिल्यानंतर पाण्याचा प्रवाह दुसऱ्या पट्ट्याकडे वळविला जातो.

आळे पद्धत

ह्या पद्धतीत 4×4 मीटर आकाराचे सपाट चौरस प्लॉट त्यांच्या चारही बाजूंनी लहान बांध घालून तयार करतात व त्यात गरज असेल तितके खोल पाणी धरून ठेवले जाते. ह्या पद्धतीत पूर्वी फळझाडांभोवती गोल आहे करीत असत, परंतु आता मोठ्या झाडांच्या बुंध्याभोवती माती चढवून ती पाण्यात बुडू देत नाहीत. ही पद्धत फळबागा आणि पालेभाज्या, कांदा, ल्युसन, इत्यादी पैसे देणाऱ्या पिकांसाठी उपयोगी असून सर्व जगभर लोकप्रिय आहे. ही पद्धत सर्व प्रकारच्या जमिनींसाठी योग्य आहे. ह्या (Methods of Watering Crops) पद्धतीत पाण्याचा उपयोग उम प्रकारे केला जातो. परंतु जर जमीन सपाट नसेल तर ती सपाट करण्यासाठी सुरुवातीला जो खर्च करावा लागतो तो जरा जास्त आहे.

हे पण वाचा….हुमणी अळीचा बंदोबस्त

सरी पद्धत

बराटे, मका, ज्वारी, कापूस, ऊस, भाजीपाला, इत्यादी रांगेत पेरल्या जाणाऱ्या पिकांना सरी पद्धतीने पाणी देतात. पिकाप्रमाणे निरनिराळ्या अवजारांनी पाहिजे तशा सन्या पाडता येतात आणि रुद सऱ्या पाडण्यासाठी सरीच्या नांगराचा उपयोग करतात. सन्या उताराला लागून पाडतात किंवा पावसामुळे आणि पाटाच्या पाण्यामुळे होणाऱ्या धुपीचे नियंत्रण करण्यासाठी समपातळीवर पाडतात. 1 ते 3 टक्के उतार असला तर सरळ पाडलेल्या सन्या चांगल्या यशस्वी झाल्या आहेत, आणि उतार जास्त असेल तर समपातळीतल्या सन्या उपयोगी पडतात. त्या केवळ धूपच थांबवीत नाहीत तर जमिनीत सारख्या प्रमाणात पाणी मुरण्यास मदत करतात.

Methods of Watering Crops : सारे पद्धत

प्रत्येक सरीची लांबी जमिनीचा उतार व त्यात पाणी झिरपण्याचे प्रमाण यांवर अवलंबून असते. रेवट पोयट्यात सरीची लांबी चिकण पोयट्याच्या मानाने बरीच कमी असते. जर उतार 1%टक्का असेल तर रेवट पोयट्यात सरीची लांबी 30 मीटर ठेवतात आणि गाळाच्या जमिनी, चिकण पोयटा आणि चिकण मातीच्या जमिनीत सरीची लांबी अनुक्रमे 400.90 आणि 150 मीटर ठेवतात. जर उतार जास्त असेल तर सरीची लांबी कमी करावी लागते.

हे पण वाच….. Vermicompost : गांडूळ खत तयार करण्याच्या पद्धती

सरीची पद्धत अशा तऱ्हेने उतारामध्ये फरक असलेल्या व जमिनीच्या पोतामध्येही फरक असलेल्या अनेक जमिनीशी योग्य रूपांतर करून साजेशी करून घेता येते आणि म्हणून रांगेत पेरलेल्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी या पद्धतीचा फार मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. मुख्य नालीतून प्रत्येक सरीत सारख्या प्रमाणात पाणी जाण्यासाठी आणि अमिनीची धूप कमी होण्यास मदत व्हावी म्हणून ठरावीक बाक दिलेल्या सायफन नळयाही हल्ली वापरतात. मोठ्या बाकाच्या गळयांचा शेतातल्या नालीतून सन्यामध्ये पाणी नेण्यासाठी उपयोग करता येतो. सर्व सत्यांमध्ये सारख्या प्रमाणात पाणी टाकण्यासाठी ह्या चांची जमिनीपासून उंची सोबीची करून घेणे मात्र आवश्यक आहे.

भारी काळ्या कापसाच्या जमिनीत सारे पद्धत आणि सरी पद्धतीचे एकत्रीकरण केले तर ते उपयोगी ठरेल. ह्या जमिनीत फार मोठ्या भेगा पडतात आणि म्हणून सारे पाडून नंतर त्यात साया हणजे भेगांमुळे पाणी एका सरीतून दुसच्या सरीत निघून जाणार नाही. ह्या एकत्रीकरणामुळे जमीन समपातळीत आणणे, हळूहळू जमिनीत सर्व जागी सारखे पाणी जिरविणे आणि धूप थांबविणे असे तिहेरी फायदे होतात.

समपातळीत सरीतून पाणी देण्याची पद्धत

ह्या पद्धतीत पाण्याच्या प्रवाहाची दिशा, त्याचा वेग कमी करण्यासाठी शेतातील उताराच्या बरोबर न करता त्याला आडवा छेद करेल अशी केली जाते. सत्यांमधून पाणी नीटपणे वाहण्यासाठी त्यांना जरुरीपुरता उतार दिलेला असतो. मुख्य दंड उताराच्या आडव्या दिशेने काढतात किंवा उताराच्या दिशेनेही काढतात, परंतु अशा वेळी पाण्याचा वेग कमी करण्यासाठी व प्रत्येक सरीत पाणी नीट सोडण्यासाठी योग्य मापाचे अडथळे बांधावे लागतात.

समपातळीतील सम्यांनी पाणी देण्याची पद्धत बहुतेक सर्व बागायती क्षेत्रात यशस्वीपणे वापरता येते. हलक्या जमिनीत 5 टक्के उतारापर्यंत उताराला आडव्या सच्या 5 पाहून यशस्वीपणे ओलीत करता येते. समपातळीत पेरणी करण्यापूर्वी शक्य तितके उंचवटे दून व खोलगट भाग भरून सपाट करतात. हे काम बेल व केणी, पेटारी, फ्लोट किंवा कुल यांसारख्या अवजारांच्या साहाय्याने किंवा मजूर लावून करतात. फळबागेत आणि इतर कायमच्या लावणीच्या क्षेत्रात समपातळीत मुख्य दंड व सऱ्या दरवर्षी काढण्याची आवश्यकता नाही. पावसाळयाच्या अगोदर समपातळीतल्या सऱ्या स्वच्छ मात्र केल्या पाहिजेत.

महाराष्ट्रात अनेक शेतकरी उसाच्या शेतीत ह्या पद्धतीने पाणी देतात. त्यामुळे पाण्याची आणि वेळेची चांगलीच बचत होते. तसेच उसाच्या खर्चातदेखील बचत होते. ही पद्धत रब्बी ज्वारी आणि कापसाच्या ओलितासाठीही लोकप्रिय होत आहे.

पाणी देण्याची फवारणी पद्धत (स्प्रिंकलर)

हे पण वाच..Integrated Farming : एकात्मिक शेती पिकांची निवड, व्यवसाय.

ह्या पद्धतीत पाणी पावसासारखे जमिनीवर फवारून जमीन ओलीत करतात. ही पद्धत रेताड जमिनीसाठी विशेषकरून उपयोगी आहे, कारण त्या जमिनी फार जलद गतीने पाणी शोषून घेतात. ज्या जमिनी फार उथळ किंवा फार उताराच्या अथवा चढणाच्या किंवा उंचसखल आहेत आणि पृष्ठभागावर सच्या, आळी इत्यादी काढून पाणी देण्यासारख्या नाहीत, त्या जमिनीवर फवारे बराबून त्यांना उत्तम प्रकारे पाणी देता येते. पृष्ठभागावरून ओलीत करण्यासाठी आवश्यक मुख्य व दुय्यम दंड सन्या असलेले बरेच क्षेत्र अडवितात ते क्षेत्रही वाचते. तसेच ओलिताच्या पाण्यातही बरीच बचत होते आणि पाण्याचे नुकसानही कमीत कमी होते.

ओलिताच्या फवारणी पद्धतीला काही मर्यादा आहेत. त्या म्हणजे (अ) शेतातील पाण्याच्या वाटपावर वाऱ्याचा परिणाम होतो आणि (आ) ह्याला लागणारा विजेचा किंवा तेलाचा खर्च इतर पद्धतीपेक्षा साधारणपणे जास्त येतो. फवारे बसविण्याचा सुरुवातीचा
खर्च फार जास्त आहे. ह्या पद्धतीत ओलिताचे पाणी स्वच्छ असावे लागते आणि फवारे काटकसरीने वापरण्यासाठी त्याचा खात्रीचा व सतत पुरवठा असला पाहिजे. ह्या फवाऱ्यांनी रिया व पालाशयुक्त रासायनिक खते आणि कीटकनाशकेदेखील पिकावर चांगल्या प्रकारे फवारता येतात.

जमिनीखालून पाणी देण्याची पद्धत (यायव्हॉल्व्ह सिस्टीम)

ही पद्धत फळबागांसाठी योग्य असून त्याचे फायदे पुढीलप्रमाणे सांगता येतील. (अ) बाष्पीभवनामुळे पाण्याचे नुकसान होत नाही. (आ) झाडांच्या मुळयांचे पाणी साचल्यामुळे होणारे नुकसान होत नाही, (इ) पाणी देण्यासाठी दंड आणि सत्या काढण्यात जी जमीन वाया जाते ती जात नाही आणि (ई) सर्व अवजारे अडथळ्याशिवाय मोकळेपणाने वापरता येतात.

जमिनीखालून पाणी देण्याचे दोन प्रकार आहेत, एक स्वाभाविक व दुसरा कृत्रिम पहिला प्रकार ज्या शेतात मुळ्या पसरण्याच्या भागाखाली तवा धरलेला असतो व मातीच्या घट्ट व कठीण थरामुळे पाणी खाली न जाता व वर साचू लागते तेथे शक्य आहे. अशा परिस्थितीत तवा धरलेल्या थरापर्यंत शेतभर खड्डे खणतात. त्यात पाणी घातल्यास ते खालून आजूबाजूला व वरती मुळयांच्या भागात पसरते व पिकाला पाण्याचा पुरवठा करते.

कृत्रिम पद्धतीत भोके पाडलेल्या या मुळा पणाच्या भागाखाली जोडून ठेवतात आणि त्यातून योग्य साधनाने खूप दाब देऊन पाणी पसरवितात. अर्थात या पद्धतीत सुरुवातीस फार खर्च करावा लागतो, परंतु पुढे त्याच्या देखरेखीवर फारच कमी येतो. ही पद्धत भारतात फार क्वचित ठिकाणी दिसते. परंतु इस्राईलसारख्या इतर देशांत जास्त प्रमाणात आढळते.

ठिबक सिंचन पद्धत (ड्रीप इरिगेशन सिस्टीम)

आतापर्यंत वापरण्यात येणाऱ्या पाणी देण्याच्या पद्धतीपकी वचत करणारी सर्वात कार्यक्षम पद्धत म्हणजे ठिबक सिंचन पद्धत अली आहे. या पद्धतीत प्लास्टिकच्या नळांना छोटे छोटे डीपर बसवलेले असतात. यातून एक एक थेंब पाणी पिकांच्या तळाशी पडत राहते. यामुळे जमीन सावकाश भिजते.

जमिनीची धूप होत नाही. शेत नेहमीच वाफसा स्थितीत राहते. त्यामुळे पिकाला पाणी अखंड उपलब्ध होत राहते. यामुळे पिके अत्यंत जोमाने व सतत वाढतात. शिवाय द्रवरूप खतेदेखील या ड्रीपरमधून देता येतात. मशागतीच्या वेळी या नळ्या काढता येतात. शिवाय शासन सिंचन संचासाठी अनुदान देत असल्याने बहुतांशी शेतकरी आता याचा फायदा घ्यायला लागलेले आहेत.

हे पण वाचा…Integrated Pest Management : एकात्मिक कीड व्यवस्थापन.

Importance of water in crop production : पीक उत्पादनात पाण्याचे महत्त्व

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top