Importance of water in crop production : पीक उत्पादनात पाण्याचे महत्त्व

भारतातल्या शेतकऱ्याची जमिनीतील पाण्याचा साठा वाढेल या आशेने फार जास्त पाणी देण्याकडे प्रवृत्ती असते. परंतु त्यामुळे पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. योग्य असेल तेवढेच पाणी वेळेवर दिले तर ते जास्त फायद्याचे ठरते आणि शिवाय जास्त क्षेत्राला पाणी देता येते. असे करण्यासाठी पाणी, जमीन आणि त्यात घेतली जाणारी पिकेयांच्यामधील संबंध नीट समजून घेणे आवश्यक आहे.या घटकाच्या अभ्यासानंतर आपल्याला पिकांना पाणी कधी व कसे द्यावे हे लक्षात येईल.

पीक उत्पादनात पाण्याचे महत्त्व (Importance of water in crop production)

जमिनीचा पोत, त्याची घडण आणि खोली यांवर जमिनीची जलधारणा शक्ती आणि वनस्पतीला पाणी पुरविण्याची क्षमता ठरत असते. बारीक पोत असलेली माती खडबडीत मातीपेक्षा जास्त पिके घेते. बारीक पोताच्या जमिनीत पोकळीचे प्रमाण व विशेषतः सूक्ष्म पोकळीचे प्रमाण जास्त असते आणि म्हणून वनस्पतीच्या उपयोगाकरिता त्या जास्त पाणी साठवून ठेवतात.

Importance of water in crop production : पीक उत्पादनात पाण्याचे महत्त्व
Importance of water in crop production : पीक उत्पादनात पाण्याचे महत्त्व

अशा जमिनीत पाण्याची हालचालही फार हळू होत असते. याउलट वाळूसारख्या किंवा मुरमाड जमिनीत मोठ्या पोकळीचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्या जास्त पाणी साठवू शकत नाहीत. निरनिराळ्या प्रकारची जमीन 1 फूट खोल भिजवण्यासाठी सारखेच एकर-इंच पाणी लागणार नाही किंवा निरनिराळ्या प्रकारची जमीन 30 सेंमी. खोल भिजण्यासाठी सारखेच हेक्टर सेंमी. पाणी लागणार नाही. ते निरनिराळ्या जमिनीकरिता निरनिराळे असेल.

हे पण वाचा…Methods of Watering Crops : पिकांना पाणी देण्याच्या पद्धती

जमीनरेतीरेवट पोयटापोयटाचिकट पोयटाचिकट माती
1 एकर क्षेत्रातील जमीन
1 फूट खोल भिजवायला लागणारे एकर-इंच पाणी
0.5

1.0

2.0

2.5

3.0
1 हेक्टर क्षेत्रातील जमीन 30 सेंमी. खोल भिजवायला लागणारे हेक्टर सेंमी. पाणी1.25

2.50

5.0

6.257.5
निरनिराळ्या प्रकारच्या जमिनींना भिजवण्यासाठी लागणारे पाणी

जे पाणी जमिनीच्या वाफसा स्थितीतील जलधारणाशक्ती (वरची सीमा) आणि कोमेजण्याचा बिंदू (खालची सीमा) यांच्यामध्ये आहे, त्याला उपलब्ध पाणी असे म्हणतात. ढोबळ मानाने वनस्पतींनी जमिनीतील सुमारे 50 टक्के उपलब्ध पाणी शोषून घेतले म्हणजे जमिनीला पाणी देण्याची गरज पडते.

रेताड जमिनीची जलधारणाशक्ती कमी असल्यामुळे जमिनीत एका वेळेला कमी पण वारंवार पाणी द्यावे लागेल. जर जास्त पाणी दिले तर ते लवकरच निचरा होऊन वाया जाईल. सेंद्रिय पदार्थांची जास्त टक्केवारी असलेल्या पोयट्याच्या मळईच्या जमिनी ओलितासाठी अधिक योग्य आणि वनस्पतीच्या वाढीला चांगल्या होत. चिकण मातीच्या जमिनींना एका वेळेला ओलितासाठी जास्त पाणी लागते पण ते कमी वेळा द्यावे लागते.

हे पण वाचा..Armyworm : मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

जमिनीतील पाणी व त्याची उपलब्धता

साधारणपणे पिकाच्या सुमारे 80 टक्के मुळ्या जमिनीच्या 30 सेंमी. च्या आत असतात व बाकीच्या जास्त खोल जातात. गवताचा मूळसंघ उथळ असून तो बहुतेक सर्व जमिनींच्या पहिल्या 30 सेंटिमीटरमध्ये वाढतो. कपाशीसारख्या खोल मूळसंघ असलेल्या पिकाच्याही सुमारे 70 टक्के मुळया पहिल्या 30 सेंटिमीटरमध्ये असतात आणि बाकीच्या 30 टक्के मुळ्या 30 ते 60 आणि 60 ते 90 सेंटिमीटर थरात असतात. फळझाडांच्या मुळचा बऱ्याच खोल जाऊन जास्त खोल गेलेल्या पाण्याचाही उपयोग करतात.

Importance of water in crop production : पीक उत्पादनात पाण्याचे महत्त्व
Importance of water in crop production : पीक उत्पादनात पाण्याचे महत्त्व

साधारणपणे रेताड जमिनीत मुळ्या खोल जातात व चिकण मातीच्या जमिनीत उथळ राहतात. उथळ किंवा घट्ट जमिनीत मुळ्यांची वाढ थांबते. त्याचप्रमाणे जर चिकण मातीचा कठीण थर (चोपण) असला किंवा पाण्याची पातळी वर असली, किंवा क्षारयुक्त द्रव्यांचे प्रमाण जमिनीत वाढले असले तर त्यामुळे मुळ्यांची वाढ मर्यादित होते. निरनिराळ्या जमिनींच्या निरनिराळ्या परिस्थितीत मुळ्यांच्या वाढीत असे जास्त फरक आढळले तरी सामान्य स्थितीत जर जमीन कमीत कमी 60 सेंटिमीटर खोलीपर्यंत ओली केली तर पिकाची वाढ समाधानकारक होते.

वाढणारे पीक जमिनीतील उपलब्ध पाण्याचा सारख्याच प्रमाणात उपयोग करून घेत नाही. शेताच्या जलधारणाशक्तीच्या अवस्थेत पीक जमिनीतून सहज पाणी घेते व जलद वाढते. जसजसे पाणी कायमच्या कोमेजण्याच्या बिंदूच्या जवळ जाते, तसतशी पिकाची वाढही कमी कमी होत जाते, त्यामुळे पिकावर पाण्याचा ताण पडण्याची शक्यता असून त्यामुळे मुळ्यांच्या वाढीला उत्तेजना मिळू शकते. वर सांगितल्याप्रमाणे सामान्यतः पिकाने जमिनीतल्या उपलब्ध पाण्याच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त पाणी ओढण्यापूर्वीच जमिनीत पाणी द्यावे. याउलट जमिनीत पाणी जास्त असले तरीदेखील वनस्पतींच्या मुळ्यांना पाणी शोषण्यासाठी विशेष ताण न पडल्याने मूळसंघ नाजूक बनतो.

हे पण वाचा…हुमणी अळीचा बंदोबस्त

पिकाची पाण्याची गरज

पिकाच्या पाण्याच्या गरजेची व्याख्या त्याच्या बाष्पोच्छवासाचे परिमाण किंवा गुणोत्तर असे करतात. म्हणजे ‘एकक कोरडा माल तयार करण्यासाठी पिकांनी जितके पाणी बाप्पोच्छ्वासावाटे सोडले त्याचे परिमाण’. सेंद्रिय आणि रासायनिक खते दिल्यामुळे साधारणपणे बाष्पोच्छ्वासाचे परिमाण कमी होते. बाष्पोच्छ्वास आणि तयार केलेला कोरडा माल यांचा बाप्पोच्छ्वासाच्या परिमाणात म्हटल्याइतका सरळ आणि सोपा संबंध नाही.

पिकाची प्रतिदिवसाची पाण्याची गरज, एकूण पाण्याच्या गरजेला पिकाच्या जीवनमर्यादेच्या दिवसांनी भाग देऊन काढतात. त्यात बाष्पोच्छ्वास, जमिनीच्या पृष्ठभागावरून होणारे बाष्पीभवन आणि निचरा होऊन झालेले पाण्याचे नुकसान या सर्वांचा विचार केला जातो.

पिकाच्या निरनिराळ्या अवस्थांवर ओलिताचा परिणाम

पिकाच्या पाण्याची गरज त्याच्या वाढीच्या सबंध काळात सारखीच नसते. बहुतेकपिकांना त्याच्या आरंभीच्या अवस्थांपेक्षा पोटरीत येण्याच्या आणि दाणे भरण्याच्या काळात जास्त पाण्याची गरज असते. धान्यपिकांना जेव्हा कणीस किंवा लोंबी तयार होत असतात तेव्हा कमाल पाणी लागते. उसाला सुमारे सहाव्या किंवा सातव्या महिन्यानंतर अधिक व वारंवार पाणी लागते. फळझाडांना त्यांच्या विश्रांतीच्या काळात पाणी देणे बंद करतात. जर पिकाच्या वाढीच्या विशिष्ट अवस्थेत पाणी दिले गेले नाही तर उत्पन्न कमी येते. पीक पेरण्यापूर्वीच्या (चिंचवणी), फुटवे फुटण्याच्या, पीक पोटरीत येण्याच्या आणि दाणे दुधात असण्याच्या या चारही अवस्थांत पाणी दिल्यास रब्बी ज्वारी व गव्हाचे उत्पन्न खूप वाढते आणि जर यांपैकी कोणत्याही एका अवस्थेत पाणी दिले गेले नाही तर उत्पन्न कमी होते.

हे पण वाचा..Vermicompost : गांडूळ खत तयार करण्याच्या पद्धती

पिकांना पाणी देण्याची वेळ

पिकाला लागणारे पाणी जमिनीतील ओलितातून पुरविले जाते. पाणी व हवायांची जमिनीतील उपलब्धता समतोल असल्यास पिकांची वाढ चांगली होते. जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण 50 टक्के झाले असता पाणी देणे गरजेचे आहे. जमिनीची खोली वाढेल त्या प्रमाणात ओलीचा साठा वाढतो. अशा जमिनीत उशिरा पाणी दिले तरी पिके पाण्याचा ताण सहन करू शकतात. याकरिता उन्हाळी हंगामात मध्यम खोल ते खोल जमिनी पिकासाठी निवडणे सयुक्तिक ठरते.

(1) पिकांना पाणी कसे द्यावे?

Importance of water in crop production

पिकांना पाणी देण्यासाठी योग्य प्रकारे रानबांधणी करणे गरजेचे ठरते. रानबांधणीमुळे पिकाला सम प्रमाणात पाणी बसण्यास मदत होऊन पिकांची वाढ एकसारखी होते. पाण्याचा दुरुपयोग आणि अपव्यय टाळण्यासाठी जमिनीचा प्रकार, उतार, आणि घेतले जाणारे पीक पाहून सारे, समपातळी, सरी, लांब सरी, ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या पद्धतींनी पाणी देता येते. पाणी नियोजनासाठी 2.5 ते 3 मीटर रुंदीचे सारे पाडून त्यांची लांबी 50 ते 60 मीटर ठेवल्यास उन्हाळी मूग, भुईमूग या पिकांचे अपेक्षित उत्पादन मिळण्यास मदत होते.

(2) पाणी केव्हा द्यावे?

मार्च ते जून महिन्यांपर्यंत दिवसाचे सरासरी बागीभवन अधिक असते. बाष्पीभवनाचा दररोजचा वेग मार्चमध्ये 7.69 मिमी., एप्रिलमध्ये 9.74 मिमी., मेमध्ये 11.04 मिमी. तर जून महिन्यात सरासरी 7.49 मिमी. बाष्पीभवन होत असते. या अनुषंगाने पिकास पाणी केव्हा द्यावे याचे प्रयोग घेण्यात आले. त्याचा आढावा पुढे दिलेला आहे. त्याप्रमाणे लागवडीच्या महिन्याप्रमाणे पाणी द्यावे.

पिकाचे नाव
पाण्याची एकूण
गरज (सेंमी./हे.)

बाष्पीभवन झालेले पाणी (मि.मि.)
उन्हाळी भुईमूग
70-80
75
उन्हाळी मूग
45-8080
उन्हाळी सूर्यफूल
60
75
ऊस
215-275
75
कापूस
95
80
आले व हळद100-11080
उन्हाळी हंगामात बाष्पीभवनानुसार पिकास पाणी नियोजन

अशा प्रकारे उन्हाळी पिकांना सरासरी 75 ते 80 मिमी. बाष्पीभवन झाल्यावर पाणी द्यावे. मार्चमध्ये 10 दिवसांनी, एप्रिलमध्ये 8 दिवसांनी, मेमध्ये 7 दिवसांनी आणि जूनमध्ये 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाणी देणे फायदेशीर ठरते. मात्र दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी पाणी बचतीचे तंत्र वापरणे क्रमप्राप्त ठरते.

हे पण वाचा…Integrated Farming : एकात्मिक शेती पिकांची निवड, व्यवसाय.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top