Horticultural crops and water management : बागायती पिके आणि पाणी व्यवस्थापन

बागायती पिकांचे पाणी व्यवस्थापन (Horticultural crops and water management) करताना पुढील बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे.

(1) वर्षातील तीनही हंगामांत उपलब्ध होणान्या पाण्याच्या साठ्यावरून पिकाची निवड करावी .

कमी पाणी लागणारी पिके : ज्वारी, बाजरी, करडई, हरभरा

मध्यम पाणी लागणारी पिके : सूर्यफूल, कपाशी, तूर

जास्त पाणी लागणारी पिके : भात, ऊस, बटाटा, उन्हाळी भुईमूग, गहू, इत्यादी.

(2) पाणी देण्यापूर्वी शक्यतो सारा यंत्राने जमिनीचा उतार व प्रकार पाहून रानबांधणी करायी. रानबांधणी करण्यापूर्वी जमिनीचे सपाटीकरण करावे. त्यामुळे जमिनीच्या उंचसखलपणा कमी होऊन पाणी जमिनीवर सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणावर पसरण्यास मदत होते.

(3) प्रवाहाची गती जास्त असल्यास त्यामुळे दंडातून (पाटातून) पाणी बाहेर जाण्याची शक्यता असते. त्यासाठी दंडात तणे किंवा गाळ साचू देऊ नये शेतात पाणी घेताना दोन ते तीन ठिकाणी पाणी विभागून घ्यावे. जेणेकरून जमिनीवरील माती वाहून जाणार नाही आणि पाणी सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात बसेल.

(4) शेतामध्ये पाणी देताना फावडे आणि घमेले (टोपले) सोबत ठेवावे. त्यामुळे पाणी फुटल्यावर कोरड्या मातीने दंड लावता येतो. रात्री पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. त्यामुळे पाण्यात बचत होते.

(5) लाभ क्षेत्रातील पाण्याची पातळी ही त्या क्षेत्रातील पिके आणि जलाशयातील पाण्याचा साठा ह्यावर अवलंबून असते. त्यामुळे पाण्याच्या पाळ्या कमी पडू शकतात. अशा वेळेस विहिरीतून पाणी द्यावे.

(6) मध्यम काळ्याभोर जमिनीवर 90% सान्याच्या लांबीइतके पाणी पोहोचल्यावर पाणी बंद करावे म्हणजे पुढील कोरडा भाग पाण्याच्या प्रवाहाने भिजला जातो शेतकऱ्यांनी पहिल्या दोन ते तीन साऱ्यांचा अंदाज घेऊन हे ठरवावे.

(7 ) पाण्याचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी त्याचा वापर मोठ्या क्षेत्रावर करावा. उदाहरणार्थ, एक हेक्टरला सहा वेळा पाणी देऊन जेवढे उत्पादन येईल त्या ऐवजी दोन हेक्टर क्षेत्रात तीन वेळा पाणी दिल्याने येणारे उत्पादन निश्चित जास्त येईल.

(8) साधारणतः सर्व धान्यपिकामध्ये फुलोरा येण्याचा काळ आणि दाणे भरण्याचा काह हा अत्यंत महत्त्वाचा असतो. ह्या काळात पाणी देणे फायद्याचे ठरते पेरणीनंतर पहिल्या सात दिवसांत पिकाची फक्त कायिक वाद होत असते. त्यामुळे ह्या काळात पाणी देण्याचे टाळावे.

Horticultural crops and water management : बागायती पिके आणि पाणी व्यवस्थापन
Horticultural crops and water management : बागायती पिके आणि पाणी व्यवस्थापन

पाण्याच्या योग्य नियोजनाकरिता पाणी हे पावसाच्या पाण्याला पूरक म्हणून वापरले पाहिजे. त्याकरिता खरीप व रब्बी हंगामांत पेरणी वेळेवर करावी. पेरणीसाठी पाण्याचा वापर करू नये. हेच पाणी पुढील महत्त्वाच्या काळात वापरता येईल. जमिनीत ओल पुरेशी नसेल तरच पाणी द्यावे.

पाणी नियोजन करताना जमिनीचा प्रकार महत्त्वाचा ठरतो. उदाहरणार्थ, मध्यम भारी जमिनीत गव्हाला पाण्याच्या 5 ते 6 पाळचा लागतात तर हलक्या जमिनीवर 10 ते 11 पाळ्या लागतात. त्यामुळे जमिनीची पीकनिहाय निवड करावी. पिकाचे उत्पन्न फक्त पाण्याने वाढत नाही तर ते पिकाच्या उन्नत जाती, हेक्टरी रोपांची संख्या. खतांचा वापर, तणे किडी आणि रोगाचा बंदोबस्त या सर्वांवर अवलंबून असते…

हे पण वाचा…Importance of water in crop production : पीक उत्पादनात पाण्याचे महत्त्व

पिकाला पाणी शक्यतोवर दुपारनंतर द्यावे. कारण दुपारच्या उष्णतेने पाण्याचे होणारे वाप्पीभवन टळेल आणि पाण्याची बचत होईल. उन्हाळयात पिकास पाण्याचा ताण बसणारच असेल तर त्यासाठी अगदी सुरुवातीपासूनच पिकास पाण्याच्या ताणाची सवय लावावी म्हणजे पिकामध्ये हळूहळू प्रतिकारशक्ती निर्माण होईल व पाण्याच्या ताणाच्या काळात पीक तग धरू शकेल. पाणी दिल्यानंतर वाफसा येताच उन्हाळयात जमिनीवर आच्छादनाचा वापर करावा. त्यामुळे जमिनीच्या पृष्ठभागावारे बाष्पीभवनाद्वारे होणारे पाण्याचे नुकसान टळेल. उन्हाळयात पाणी अगदीच कमी असेल आणि उसाची पाने वाळत आहेत अशी स्थिती असेल तर अशा परिस्थितीत शेवटचा मार्ग म्हणजे पिकाची शेंड्याकडील 5 ते 6 पाने ठेवून बाकीची पाने काढून टाकावीत. अर्धवट हिरवी पाने चारा म्हणून तर वाळलेली पाने आच्छादन म्हणून वापरावीत.

हे पण वाचा…Methods of Watering Crops : पिकांना पाणी देण्याच्या पद्धती

शक्य झाल्यास ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा कारण या पद्धतीमुळे…

Horticultural crops and water management

(1) पाण्याची 40 ते 50 टक्क्यांपर्यंत बचत होते.

(2) शेतमालाची प्रत सुधारते

(3) जमिनीतील पाणी, प्राणवायू, सूक्ष्मजीव, अन्नद्रव्याची उपलब्धता यांचा समन्वय साधल्यामुळे उत्पादन वाढते.
(4) तणे, किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. त्यामुळे त्यांच्या बंदोबस्तावरील होणारा खर्च कमी होतो.

(5) पाण्यात विरघळणारी खते आणि काही तणनाशके ठिबक सिंचनाद्वारे देता येत असल्यामुळे खतामध्ये सुमारे 25 टक्क्यांपर्यंत बचत होते.

(6) जमिनीच्या रानबांधणीवर होणारा खर्च टळतो आणि रानबांधणीखाली येणारे क्षेत्र पिकाखाली आणता येते.

(7) पिकाच्या आवश्यकतेप्रमाणे पाणी दिल्यामुळे कालांतराने जमीन खारवट अथवा चोपण होत नाही.

(8) मनुष्यशक्ती, इंधन व वीज कार्यशक्तीच्या खर्चात बचत होते.

हे पण वाचा…Armyworm : मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

हुमणी अळीचा बंदोबस्त

Vermicompost : गांडूळ खत तयार करण्याच्या पद्धती

Comments are closed.

Scroll to Top