Crop cultivation method : पिक लागवड पद्दत

पिकांच्या लागवड पद्धतीत (Crop cultivation method) बदल उस, कपाशी या पिकांची जोड ओळ पद्धतीने लागवड केल्यास पाण्याची बचत होते. त्याकरिता 3 फुटांवर सऱ्या पाडून दोन ओळीत उसाची किंवा कपाशीची लागवड करून एक ओळ रिकामी सोडून पुन्हा दोन ओळी लावाव्यात. लागवड केलेल्या दोन सऱ्यांमध्ये पिकांची चांगली उगवण झाल्यानंतर पुन्हा सरी पाडावी.

दोन जोड ओळींमध्ये पाडलेल्या सरीलाच फक्त पाणी दिल्यास पाण्याची निश्चित बचत होऊ शकते. जोड ओळींमधील वरंब्यावर सरी पाडून त्या सरीला पाणी दिल्यास साधारणतः 25% पाण्याची बचत होते.

लांब सरी पद्धत

उसाची लागवड करणारे शेतकरी ऊस लागण करण्यापूर्वी पाणी देण्यासाठी 7 ते 9 सत्यांचा कट पाडतात. या पद्धतीत कटाची उंची 1.5 ते 2 फूट ठेवतात, त्यामुळे उसाला मुबलक पाणी दिले जाते. याबाबत प्रत्यक्ष पाहणी केली असता असे दिसते की कट पद्धतीने शेतकरी गरजेपेक्षा 3 ते 4 पट पाणी जास्त देतात. कट पद्धतीत 30 ते 45 सेंमी. पाणी दिले जाते. प्रत्यक्षात गरज ही फक्त 8 ते 10 सेंमी. असते. वर्षानुवर्षे उसाचे पीक भरपूर पाणी देत घेतल्याने जमिनीचा सामू (पी.एच.) वाढून जमिनी चोपण झाल्याचे आढळते.

Crop cultivation method
Crop cultivation method : पिक लागवड पद्दत

हे पण वाचा…Methods of Watering Crops : पिकांना पाणी देण्याच्या पद्धती

पाण्याचा बेसुमार वापर टाळण्यासाठी लांब सरी पद्धतीने उसाची लागण करावी. प्रत्येक सरीमध्ये पाणी सोडावे. या पद्धतीत दिलेल्या पाण्याची कार्यक्षमता कट पद्धतीपेक्षा जास्त असते. पाण्याचा अपव्यय टाळला जातो आणि जमीन लवकर वाफशावर येते पाणीटंचाईच्या काळात, प्रत्येक सरीत पाणी न सोडता एकाआड एक सरीत पाणी सोडले तरीही उत्पन्नात फारसा फरक पडत नाही असे आढळून आले आहे.

आच्छादनाचा वापर

पालापाचोळा वापरल्याने पाण्याचे लवकर बाष्पीभवन होण्यापासून बचाव होऊ शकतो. उन्हाळी भुईमूग, कलिंगड, ऊस यासारख्या पिकांमध्ये पीक उगवण झाल्यानंतर हेक्टरी 5 टन पाचट दोन ओळीमध्ये पसरून द्यावे. पाचटामुळेजमिनीतील ओल दीर्घ काळ टिकून राहते. त्यामुळे पाण्याचे दोन पाळींतील अंतर 5 ते 6 दिवसांनी लांबविले जाते आणि एकूण पाण्याच्या पाळ्यांमध्ये बचत होते. उसाच्या पिकास उन्हाळयात 8 ते 10 दिवसांनी पाणी द्यावे लागते.

Water Saving Farming Techniques

पाचटाचा वापर करून 15 ते 20 दिवसांनी पाणी देऊन पाण्याचा काटकसरीने वापर करता येतो. याशिवाय पाण्यासाठी स्पर्धा करणाऱ्या तणांचाही पाचटाच्या आच्छादनामुळे बंदोबस्त होतो. उन्हाळी भुईमुगात प्लास्टिक पेपरचा वापर केल्यास पाण्याची बचत तर होतेच शिवाय उत्पादनातही लक्षणीय वाढ होते.

हे पण वाचा…Santra Ambia Bahar : संत्रा बागेत आंबिया बहार घेताना या गोष्टी लक्षात ठेवा

ठिबक पद्धतीचा वापर

ठिबक पद्धतीमुळे जवळपास दुप्पट क्षेत्र सिंचनाखाली आणता येते. ठिबक सिंचनाने पाणी देणे हे ऊस, कापूस, केळी या बागायती किंवा पाण्याची जास्त गरज असलेल्या पिकांना फायदेशीर असल्याचे प्रयोगात दिसून आले आहे. पाणी व्यवस्थापन (Crop cultivation method) प्रकल्प, राहुरी या ठिकाणी ठिबक सिंचन वापरून झालेली पाण्याची बचत व मिळालेले उत्पादन याची आकडेवारी तक्ता 7.3 मध्ये दिलेली आहे.या पद्धतीमुळे खतांच्या मात्रेतसुद्धा 25 ते 50 टक्के बचत होऊन उत्पादन प्रचलित पद्धतीपेक्षा अधिक मिळाले आहे.

फळझाडांसाठी आच्छादनाचा वापर करणे

Crop cultivation method

याशिवाय फळझाडांसाठीसुद्धा आच्छादनाचा वापर करणे, नवीन लावलेल्या रोपट्यांना सावलीची सोय करणे, मोजक्या फळझाडांना मडका सिंचन पद्धतीचा अवलंब करणे, यांसारखे पाणी बचतीचे व काटकसरीने पाणी वापरण्याचे अनेक उपाय करता येतील. उसासारख्या पिकाची खालील पाने कमी करून फक्त वरची पाने ठेवून पाण्याच्या वापरात बचत करता येते. किंवा 7% केओलीनचे 2 ते 3 फवारे दिल्यास पर्णोत्सर्जन कमी होऊन जमिनीतील ओल बराच काळ पिकास उपयुक्त ठरते. आपल्याकडील परिस्थितीनुसार योग्य तंत्राचा वापर केल्यास पाणीटंचाईवर निश्चितच मात करता येईल. होऊन जमिनीतील ओल बराच काळ पिकास उपयुक्त ठरते. आपल्याकडील परिस्थितीनुसार योग्य तंत्राचा वापर केल्यास पाणीटंचाईवर निश्चितच मात करता येईल.

हे पण वाचा….Pigeon pea : तुरीची लागवड करताना कोणती काळजी घ्यावी?

सिंचनासाठी पाण्याची गुणवत्ता

ओलिताचे पाणी ज्या जागेतून उपलब्ध झाले असेल त्यानुसार त्यात चिकट माती, गाळ, सेंद्रिय पदार्थ आणि क्षार वाहून आलेले असतात. जे पदार्थ ओलिताच्या पाण्यात वाहत येऊन जमिनीवर स्थिर होतात ते खत म्हणून ग्राह्य असतात. त्या पाण्यात विरघळलेले पदार्थ म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम आणि कचित प्रसंगी पोटॅशियमचे सल्फेटस्, क्लोराईडस्, कार्बोनेटस्, बायकार्बोनेटस् किंवा नायट्रेट्स्चे यांपैकी एक किंवा अनेक क्षार असू शकतात.

ओलिताच्या पाण्याचे गुणधर्म केवळ त्यात कोणत्या प्रकारचे क्षार विरघळलेले आहेत ह्यावर अवलंबून नसून एकूण क्षारांवरही अवलंबून असतात. चांगल्या निचऱ्याच्या जमिनीत व निचऱ्याला अडथळा होणाऱ्या जमिनीत ओलितासाठी वापरावयाच्या पाण्यात किती प्रमाणात क्षार चालू शकतील त्याच्या मर्यादा

क्षार
चांगल्या निचऱ्याची जमीनचांगल्या निचऱ्याची जमीनचांगल्या निचऱ्याची जमीननिचऱ्यात अडथळा होणाऱ्या जमिनीनिचऱ्यात अडथळा होणाऱ्या जमिनीनिचऱ्यात अडथळा होणाऱ्या जमिनी


चांगले माध्यम वाईटचांगलेमाध्यम वाईट

एकूण विरघळणारे क्षार
100
100-15015015075-100100

सोडियम कार्बोनेट
88-1010105-8 8

सोडियम बायकार्बोनेट

1212-1515158-1212
सोडियम सल्फेट

2020-203020-2010-1515
सोडियम क्लोराईड

3030-505030-5015-2020
कॅल्शियम : नायट्रोजन प्रमण111111
एक लक्ष भाग ओलिताच्या पाण्यात किती भाग चार चालू शकते त्याच्या मर्यादा

साधारणपणे नदीचे अथवा कालव्याचे (कॅनॉल) पाणी ओलितासाठी योग्य असते. काही विहिरीच्या पाण्यात जास्त क्षार असतात आणि ते वापरताना काळजी घेणे गरजेचे असते.

हे पण वाचा…Horticultural crops and water management : बागायती पिके आणि पाणी व्यवस्थापन

Importance of water in crop production : पीक उत्पादनात पाण्याचे महत्त्व

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top