Weed Management : तणव्यवस्थापन

‘शास्त्रोक्त पद्धतीने शेती केल्याशिवाय शेती हा व्यवसाय किफायतशीरपणे करता येणार नाही’ हे तत्त्व आता नव्याने सांगण्याची गरज भासणार नाही. शेती किफायतशीर बनविण्यासाठी पिकांमधील तणांचा बंदोवस्त(weed management) ही महत्वाची बाब आहे. त्यातूनच ‘तणखाई धन’ अशी म्हण रूढ झाली. परंतु शास्त्रीय दृष्ट्या तणांचा बंदोबस्त (weed management) करण्यासाठी कमी प्रयत्न केले जातात. अलीकडे पिकांतील तणांच्या बंदोबस्ताचा (weed management) प्रश्न हा मजुरीचे दर आणि औद्योगिकीकरण यांमुळे अधिक महत्त्वाचा बनला आहे. तानशास्त्र एक स्वतंत्रशास्त्र उदयास आलेले आहे.
या वर मात करण्यासाठी शेतकरी प्राचीन काळापासून प्रयत्नशील राहिला आहे. त्यासाठी पूर्वी हात- अवजारांचा वापर केला जात असे. त्यानंतरजनावरांच्या साहाय्याने आंतरमशागतीने तणांचा बंदोबस्त करण्यात शेतकारी प्रयत्नशील राहिला.

weed management : तणव्यवस्थापन
weed management : तणव्यवस्थापन

हे पण वाचा…Crop cultivation method : पिक लागवड पद्दत

तणांवर मात करण्यासाठी (weed management) मानवाने मशागतीची सुधारलेली साधने व अवगत पद्धती शोधून काढल्या आहेत. आधुनिक शेतीशास्त्रात अनेक तणनाशकांचा शोध व त्याचा मोठ्या प्रमाणात वापर परकीय देशांत होत असला तरी हाताने भांगलण करून तणांचा बंदोबस्त करण्याची पारंपरिक पद्धतच अजून भारतात वापरली जाते. भारतामध्ये या क्षेत्रात मंद गतीने चाललेल्या वाटचालीची काही प्रमुख कारणे म्हणजे मजुरांच्या उपलब्धतेचा प्रश्न, तणनाशकांच्या न परवडणाऱ्या किमती, शेतीच्या जुन्या पारंपरिक पद्धती संशोधनात्मक शास्त्रीय माहितीची उणीव आणि प्रशिक्षित व अनुभवी विस्तार अधिकान्यांची उणीव ही आहेत.

या घटकाच्या अभ्यासानंतर आपल्याला तणांची वैशिष्टये, त्यांचे फायदे व तोटे माहीत होतील, तसेच तण बंदोबस्ताच्या पद्धती आणि त्यांचे व्यवस्थापन तंत्र समजेल.

हे पण वाचा…Horticultural crops and water management : बागायती पिके आणि पाणी व्यवस्थापन

नको त्या ठिकाणी वाढणारी, नको असलेली वनस्पती म्हणजे तण, अशी तणांची सोपी व्याख्या करता येईल. या व्याख्येप्रमाणे कपाशीच्या पिकात वाढणारे ज्वारीचे रोपटेदेखील तण म्हणून गणले जाते. म्हणून तण काढताना हे रोपदेखील काढावे लागते. परंतु खरे तण म्हणजे निरुपयोगी, जोमदार वाढणारी, चिकटून राहणारी, पिकाबरोबर स्पर्धा करणारी हानीकारक वनस्पती होय. इतकेच नव्हे तर त्यांच्यापैकी काही वनस्पती विचारी आहेत. तणांमुळे मशागतीमध्ये अडथळा निर्माण होऊन मशागतीचा वर्ग जातो आणि शेवटी पिकाचे एकूण उत्पादन घटून उत्पादनखर्च वाढतो. बरेच वेळी तणांचे बी मळणीच्या वेळी धान्यात मिसळल्याने धान्याची प्रत खालावते.

हे पण वाचा….Importance of water in crop production : पीक उत्पादनात पाण्याचे महत्त्व

कृषि उत्पादन वाढविण्यासाठी सुधारित औत, अवजारे, बियाणे, लागवड पद्धती, खते यांचा वापर केला जातो. पीकसंरक्षण हे या उपक्रमातील महत्त्वाचे अंग आहे. पीकसंरक्षण म्हणजे सर्वसामान्यपणे कीड व रोगांचे नियंत्रण एवढेच समजले जाते. परंतु तणांचे निर्मूलन हाटी पीकसंरक्षणाचाच एक भाग आहे. तणांचा बंदोबस्त केल्याने पिकांचंतनांमुळे पीक उत्पादन पटले, मजुरीचा तसेच मशागतीचा खर्च वाढतो, धान्याची प्रत खालावते आदी तणांच्या तोट्याच्या बाजू आहेत. पण काही वेळेला हे तप उपयुक्तदेखील ठरते. मोकळ्या रानात वडनारे तन जमिनीची धूप थांबिवण्यास मदत करते. काही तणे चारा, पालेभाजी म्हणून उपयुक्त आहेत. परंतु होणारे लाभ आणि नुकसान पाहता नुकसानच अधिक आहे. म्हणून त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे

हे पण वाचा…Methods of Watering Crops : पिकांना पाणी देण्याच्या पद्धती

तणांचे गुणधर्म

(1) अनावश्यक ठिकाणी उगवतात आणि वाढतात.

(2) पिकांबरोबर स्पर्धात्मक आणि आक्रमक भूमिका घेतात. त्यामुळे पिकांना ओलावा, अन्नद्रव्ये कमी मिळतात.

(3) तणांची वाढ जलद होते व त्यांची संख्या जास्त असते.

(4) बहुतेक तणे निरुपयोगी असतात.

(5) मानव, जनावरे व पिकांना काही वर्णं घातक असतात.

(6) मशागत न करताही एकदम उगवतात.

(7) त्यांच्यात उत्पादनक्षमता जास्त असूनबागबगीचाचे, इत्यादींचे सौंदर्य त्यामुळे नष्ट होते.

तणांचे तोटे

तणांमुळे पिकांचे नुकसान होते. किडी, रोगराई, वैगेरे पिकांना हानीकारक असलेल्या शत्रूंपैकी तणे हा पिकांचा जास्त नुकसानकारक शत्रू आहे. ही तणे अनेक मार्गांनी पिकांना धोकादायक ठरतात.

(1) पिकांच्या उत्पादनात घट येते : शेतातील पिकांबरोबर तणे अन्नांश, पाणी, सूर्यप्रकाश, हवा व जागा यांच्या बाबतीत भागीदार बनून स्पर्धा करतात. त्यामुळे पिकांची उत्पादनक्षमता कमी होते. पिकांचे जास्तीत जास्त 70 ते 80 टक्के उत्पन्न तणांमुळे घटल्याची अनेक उदाहरणे आहेत. मुख्य पिकाशिवाय भाजीपाला, चारीची फळझाडे यांचेही उत्पन्न तणांमुळे घटते. निसर्गाच्या नियमानुसार टिकून राहण्याच्या क्षमतेमुळे तण पिकास भारी पडते. जे पीक सावकाश वाढणारे आणि कमी उंचीचे असते, अशा पिकांना तणांपासून फारच उपद्रव होतो. उंच व झपाट्याने वाढणारी पिके त्या मानाने तणाशी स्पर्धा करू शकतात.

(2) तणांमुळे मशागतीचा खर्च वाढतो : भांगलण, कोळपणी, फवारणी, वगैरेंसारख्या बहुविध बाबींवर जास्त खर्च करावा लागल्याने मशागतीवरील एकंदर खर्च वाढतो. पिकापासून मिळणाच्या उत्पन्नाच्या सुमारे 10 टक्के खर्च त्याच्या मशागतीवर करावा लागतो. जवळजवळ 50 टक्के खर्च तणांमुळे होतो.

(3) तणांचे बी मिसळलेल्या धान्याचे बी स्वच्छ करण्यासाठी खर्च वाढतो

(4) रस्ते व रेल्वे मार्ग स्वच्छ करण्यासाठी जादा खर्च करावा लागतो.

(5) शेतातील पाणी निचरून जावे म्हणून काढलेले भर, पाण्याचे कालवे, पाट व त्यांच्या बाजूची जागा

स्वच्छ करावी लागते.

(6) तणांनी भरलेल्या शेतात मशागत करताना बैलांना जास्त जोर लावावा लागतो. त्यामुळे मशागतीस वेळ जास्त लागतो. तसेच औत-अवजारांची लवकर झीज झाल्यामुळे त्यांचे भाग वरचे वर बदलावे लागतात.

(7) पाण्याच्या पाटात तणे असतील तर वाहत्या पाण्याच्या प्रवाहास अडथळा होऊन बागायतींसाठी

वापरावयाच्या पाण्याची कार्यक्षमता कमी होते.

(8) तणांमुळे शेतमालाची प्रत विघडते.

(9) वार्षिक / बहुवार्षिक तणांमुळे शेतजमिनीची किंमत कमी होते. दलदलीच्या ठिकाणीतणांच्या

उपद्रवामुळे अनारोग्य उद्भवते.

(10) कीड व रोग पसरविणाऱ्या जीवजंतूंना तणे आश्रय देतात. काही वेळा कीटकांचे जीवनचक्र पूर्ण होण्यासाठी पर्यायी वनस्पती म्हणून कीटकांकडून तणांचा वापर होतो. मोसंबी वर्गीय पिकावर आढळणारा पतंग त्याच्या जीवनक्रमाच्या सुरुवातीच्या अवस्थेत गुळवेल तणावर गुजराण करतो.

(11) तणे मानवाच्या व जनावरांच्या आरोग्यास घातक ठरतात. जनावरांच्या खाद्याची प्रत बिघडते. त्यामुळे त्यांच्यापासून मिळणाच्या मालाची प्रत खालावते. काही तणे प्राणिमात्रास विषारी ठरतात. उदाहरणार्थ, धोतऱ्याचे बी. चटक चांदणी सारख्या काही तणांच्या परागकणांमुळे मानवामध्ये अॅलर्जी निर्माण होते. धोतऱ्यासारख्या वनस्पतीच्या विषारी बिया खाल्ल्याने मृत्यू येण्याची शक्यता असते.

(12) काही तणांच्या जोरदार वाढीमुळे उदाहरणार्थ, लव्हाळा व क्वॅग ग्रास, इत्यादींच्या वाढीमुळे शेतातील पिकांच्या उगवणीवर परिणाम होतो.

(13)पाण्यातील शेवाळ्यापासून निघणारा द्रव माशांना घातक ठरतो.

(14) तणांमुळे बागबगीचांचेही नुकसान होते.

हे पण वाचा….Armyworm : मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

तणांचे फायदे

तणांमुळे अनेक तोटे होत असले तरी त्यांच्यापासून काही फायदेही होतात, ते खाली दिलेले आहेत.

(1) नांगरट करून जमिनीत गाडल्यामुळे तणांपासून ह्यूमस व अन्नद्रव्ये मिळतात. अनेकतणांमध्ये नत्रासारखी पोषक द्रव्ये भरपूर प्रमाणात मिळतात.

तणनत्र (टक्के)
बावची3.69
गोखरू3.10
धोतरा3.08

(2) काही वेळा भूपृष्ठ, तणांनी आच्छादल्यामुळे जमिनीची होणारी धूप थांबविली जाते.

(3) काही तणाचा जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयोग होतो. उदाहरणार्थ, हरळी,

(4) काही क्षणांचा आहारामध्ये भाजीपाल्यांसाठी उपयोग होतो. उदाहरणार्थ, पाधरी, चांदवेल, तांदुळजा,

(5) काही तणांचा औषधी वनस्पती म्हणून उपयोग केला जातो. उदाहरणार्थ, आघाड्याचा साप चावल्यावर, रुईच्या चिकाचा पोट साफ करण्यासाठी, पिवळ्या धोतऱ्याच्या तेलाचा खरजेवर व कातडी रोगावर, भुई आवळ्याचा उपयोग मूत्रपिंड व मूत्राशयाच्या विकारांवर, एकदांडीचा जखमेवर, इत्यादी.

( 6 ) काही तणांचा सुंगधी तेलासाठी वापर केला जातो. उदाहरणार्थ, लव्हाळ्याच्या गाठीचा अगरबत्ती, सुवासिक तेल करण्यासाठी वापर केला जातो.

(7) तणे चिवट असून प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्याचे वैशिष्ट्य त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्याशी संकर करून पिकांच्या नवीन जाती निर्माण करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. उदाहरणार्थ, कंस चिवट व रोगप्रतिकारक असल्याने उसाच्या जाती तयार करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो.

(8) विम्लयुक्त जमिनी सुधारण्यासाठी पिवळ्या धोतऱ्यासारख्या तणांचा उपयोग होतो असे आढळले आहे.अनेक तणांना सुंदर व आकर्षक फुले येत असल्यामुळे या फुलांचा सौंदर्यप्रसाधने तयार करण्यासाठी उपयोग केला जातो. उदाहरणार्थ, घाणेरी.

हे पण वाचा…Santra Ambia Bahar : संत्रा बागेत आंबिया बहार घेताना या गोष्टी लक्षात ठेवा

Pigeon pea : तुरीची लागवड करताना कोणती काळजी घ्यावी?

Plant Nutrition : वनस्पतींमधील अन्नद्रव्य, कार्ये, कमतरतेची लक्षणे.

Comments are closed.

Scroll to Top